IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

IPL 2026 Points Table Latest Update: आयपीएल 2026 च्या 31व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव करत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
IPL 2026 Points Table Latest Update
srhDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2026 Points Table Latest Update: आयपीएल 2026 च्या 31व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव करत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात फलंदाजांच्या तुफानी फटकेबाजीमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीसमोर 243 धावांचे अवाढव्य लक्ष्य ठेवले. या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करुनही 20 षटकांत 9 गडी गमावून 195 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

हैदराबादच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेकने दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. त्याने केवळ 68 चेंडूंमध्ये नाबाद 135 धावांची विस्फोटक खेळी खेळली. त्याच्या या वादळी डावात 10 खणखणीत चौकार आणि 10 गगनभेदी षटकारांचा समावेश होता. अभिषेकच्या या शतकी खेळीमुळेच हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली आणि याच जोरावर त्यांनी दिल्लीला बॅकफूटवर ढकलले. दिल्लीच्या फलंदाजांना हैदराबादच्या गोलंदाजीसमोर ठराविक अंतराने विकेट्स गमवाव्या लागल्याने त्यांचा डाव विखुरला गेला.

IPL 2026 Points Table Latest Update
IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

दुसरीकडे, या विजयामुळे आयपीएल 2026 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. दिल्लीला नमवून सनरायझर्स हैदराबादने टेबलमध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या विजयापूर्वी हैदराबाद चौथ्या क्रमांकावर होता, मात्र आता 8 गुण आणि +1.171 च्या सरस नेट रनरेटसह त्यांनी आपली स्थिती मजबूत केली. हैदराबादच्या या भरारीमुळे राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) मात्र मोठा फटका बसला असून त्यांची एका स्थानाने घसरण होऊन ते चौथ्या क्रमांकावर आले. राजस्थानकडेही 8 गुण असले तरी त्यांचा नेट रनरेट (+0.820) हैदराबादपेक्षा कमी असल्याने त्यांना हे स्थान गमवावे लागले. या पराभवानंतरही दिल्ली कॅपिटल्स 6 गुणांसह पाचव्या स्थानी कायम आहे.

IPL 2026 Points Table Latest Update
IPL 2026 Points Table: टायटन्सची चालली जादू! कोलकात्याला हरवून गुजरातनं गुणतालिकेत केला उलटफेर; हैदराबाद आणि दिल्लीला फटका

सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने अव्वल स्थानी आपला कब्जा कायम राखला. पंजाबचा संघ या हंगामात आतापर्यंत अजिंक्य असून त्यांनी 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसाने वाहून गेल्यामुळे त्यांच्या खात्यात 11 गुण जमा झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टेबलमध्ये खाली मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर संघर्ष करताना दिसत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था अत्यंत बिकट असून 7 सामन्यात केवळ एका विजयासह ते तळाला आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com