CSK vs RCB X/ChennaiIPL
क्रीडा

IPL 2024 Schedule: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! 'हे' दोन संघ चेन्नईमध्ये खेळणार पहिला सामना

IPL 2024 Time Table: आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिला सामना चेन्नईत रंगणार आहे.

Pranali Kodre

IPL 2024 first 21 matches schedule announced

यंदा इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम सुरू होणार आहे. मात्र, आयपीएल आणि लोकसभा निवडणूकांच्या तारखा एकाचवेळी येत असल्याने वेळापत्रक जाहीर होण्यात उशीर होत होता. अखेर बीसीसीआयने गुरुवारी (22 फेबुवारी) आयपीएल 2024 मधील पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक घोषित केले आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेला बरोबर एक महिन्याने म्हणजेच 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामात एकूण 74 सामने होणार असून यातील पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. म्हणजेच सध्या 7 एप्रिलपर्यंत वेळापत्रक घोषित झाले आहे.

आयपीएल 2024 मधील पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये रंगणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकांच्या तारखा आल्यानंतर पुढील वेळापत्रक जाहीर होणार आहे.

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही होम-अवे म्हणजेच घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर अशा पद्धतीने सामने होणार आहेत. सध्या जाहीर झालेल्या 21 सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स त्यांचे घरचे दोन सामने विशाखापट्टणमला खेळणार आहे.

त्याचबरोबर 23 मार्च, 24 मार्च, 31 मार्च आणि 7 एप्रिल रोजी डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) खेळवण्यात येणार आहे. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी 2.30 वाजता चालू होईल, तर दुसरा सामना संध्याकाळी 6.30 वाजता चालू होईल. तसेच बाकी दिवशी एकच सामना असल्याने ते संध्याकाळी 6.30 वाजता चालू होईल.

असे आहे वेळापत्रक (22 मार्च ते 7 एप्रिल)

  • 22 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई (संध्या. 6.30 वाजता)

  • 23 मार्च - पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मोहाली (दु. 2.30 वाजता)

  • 23 मार्च - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता (संध्या.6.30 वाजता)

  • 24 मार्च - राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, जयपूर (दु. 2.30 वाजता)

  • 24 मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद (संध्या. 6.30 वाजता)

  • 25 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, बंगळुरू (संध्या. 6.30वाजता)

  • 26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, चेन्नई (संध्या. 6.30 वाजता)

  • 27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद (संध्या. 6.30 वाजता)

  • 28 मार्च - राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर (संध्या. 6.30 वाजता)

  • 29 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगळुरू (संध्या. 6.30 वाजता)

  • 30 मार्च - लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, लखनऊ (संध्या. 6.30 वाजता)

  • 31 मार्च - गुजराट टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद (दु. 2.30 वाजता)

  • 31 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, विशाखापट्टणम (संध्या. 6.30 वाजता)

  • 1 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई (संध्या. 6.30 वाजता)

  • 2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, बंगळुरू (संध्या. 6.30 वाजता)

  • 3 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, विशाखापट्टणम (संध्या. 6.30 वाजता)

  • 4 एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, अहमदाबाद (संध्या. 6.30 वाजता)

  • 5 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद (संध्या. 6.30 वाजता)

  • 6 एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, जयपूर (संध्या. 6.30 वाजता)

  • 7 एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई (दु. 2.30 वाजता)

  • 7 एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनऊ (संध्या. 6.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT