Mohammad Shami: गिलच्या गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं! शमी IPL 2024 मधून बाहेर, मोठी अपडेट आली समोर

Mohammed Shami ruled out of IPL 2024 : गुजरात टायटन्स संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2024 मधून बाहेर झाल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे.
Mohammed Shami
Mohammed ShamiX/IPL
Published on
Updated on

Mohammed Shami ruled out of IPL 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व संघांची तयारी सुरू झाली आहे. अशातच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी आयपीएल 2024 हंगामातून बाहेर झाला आहे.

मोहम्मद शमी डाव्या घोट्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्याचमुळे आता त्याला युकेमध्ये शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्याला आयपीएल 2024 हंगामात खेळता येणार नाही, याबद्दल बीसीसीआयच्या सुत्राने पीटीआयला माहिती दिली आहे.

Mohammed Shami
Mohammad Shami: शमी बनला देवदूत! अपघात झालेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण, पाहा Video

शमीच्या बाहेर होण्याने गुजरातला मोठा धक्का बसला आहे, कारण या हंगामापूर्वी त्यांना पहिले विजेतेपद जिंकून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. त्यातच आता शमीही दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर गेला आहे.

शमीने गेल्या काही काळात शानदार कामगिरी केली आहे. त्याने गेल्या दोन आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. त्याने 2022 आयपीएलमध्ये 20 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 2023 आयपीएलमध्ये त्याने 28 विकेट्स घेतल्या होत्या.

तथापि, शमी आयपीएलमधून बाहेर गेल्याची अद्याप अधिकृत घोषणा बीसीसीआय किंवा गुजरात टायटन्सकडून करण्यात आलेली नाही.

Mohammed Shami
IPL 2024 साठी कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठा बदल, इंग्लिश गोलंदाजाच्या बदली खेळाडूची घोषणा

दरम्यान, शमी बऱ्याच महिन्यापासून घोट्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्याने भारतात झालेल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. त्याने या वर्ल्डकपमध्ये भारतासाठी शानदार कामगिरी केली होती. तो या वर्ल्डकपमधील सर्वाधिक 24 विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

मात्र, त्यानंतर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याला तसेच सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेलाही मुकला आहे. आता भारतीय संघव्यवस्थापनेला आशा असेल की शमी जूनमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्डकपपर्यंत पूर्ण तंदुरुस्त होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com