IPL 2023 च्या मध्यातच, सनरायझर्स हैदराबाद (SRH) साठी एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे. वास्तविक, सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा मॅच विनर खेळाडू IPL 2023 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.
हा खेळाडू जखमी होऊन IPL 2023 च्या मोसमातून बाहेर पडणे हा सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघासाठी मोठा धक्का आहे. कारण हा क्रिकेटपटू त्याच्या विस्फोटक फलंदाजी आणि घातक गोलंदाजीच्या सहाय्याने सामने जिंकण्यासाठी ओळखला जातो.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. खुद्द सनरायझर्स हैदराबाद संघाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) फ्रँचायझीने ट्विट केले की, 'वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे.'
सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर या आयपीएल हंगामात बॉल आणि बॅटने फ्लॉप ठरला आहे. वॉशिंग्टन सुंदरला आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत झालेल्या 7 सामन्यांमध्ये केवळ 3 विकेट घेता आल्या आहेत.
सुंदरने या आयपीएल 2023 हंगामातील 7 सामन्यांमध्ये एकूण 17.4 षटके टाकली, ज्यामध्ये त्याने 146 धावा दिल्या. या काळात वॉशिंग्टन सुंदरला केवळ 3 विकेट घेता आल्या. विशेष म्हणजे, सुंदर फलंदाजीतही सपशेल अपयशी ठरला आहे.
वॉशिंग्टन सुंदरने आयपीएल 2023 हंगामातील 7 सामन्यांमध्ये एकूण 60 धावा केल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) या मोसमातील शेवटच्या सामन्यात 4 षटकात 28 धावा देऊन 3 बळी घेतले.
वॉशिंग्टन सुंदरनेही 15 चेंडूत 24 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी 4 कसोटी सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत आणि 265 धावाही केल्या आहेत.
तसेच, वॉशिंग्टन सुंदरने 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 16 आणि 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 बळी घेतले आहेत.
वॉशिंग्टन सुंदरने एकदिवसीय सामन्यांमध्ये 233 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 107 धावा केल्या आहेत. सुंदरने 58 आयपीएल सामन्यांमध्ये 36 विकेट घेतल्या आहेत आणि 378 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.