Shubman Gill | Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill Video: नादच खुळा! गिलच्या 106 मीटर खणखणीत सिक्सवर कॅप्टन हार्दिकची लक्षवेधक रिऍक्शन

आयपीएल 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने शानदार शतकी खेळी करताना एक 106 मीटरचा खणखणीत षटकार मारला.

Pranali Kodre

Shubman Gill 106 meter six: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुभमन गिलने शतकी खेळी केली आहे.

गिलने 49 चेंडूत त्याचे या सामन्यातील शतक पूर्ण केले. त्याने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 13 व्या षटकात मारलेल्या एका षटकाराने सर्वांचीच वाहवा मिळवली.

झाले असे की 13 व्या षटकात मुंबई इंडियन्सकडून पीयुष चावला गोलंदाजीला आला होता. त्याने टाकलेल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर गिलने पुढे येत खणखणीत षटकार ठोकला. त्याचा हा षटकाराचा चेंडू तब्बल 106 मीटर लांब गेला. त्याच्या हा शानदार शॉटचे सर्वांनीच कौतुक केले.

तसेच या शॉटनंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने दिलेली रिऍक्शनही लक्षवेधक ठरली. गिलचा हा षटकार पाहून हार्दिकने कौतुकाने आणि आनंदाने त्याची मान डोलावत टाळ्या वाजवल्या.

दरम्यान, गिलचे हे आयपीएल 2023 मधील तिसरे शतक आहे. त्याने यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध शतक केले होते. त्यामुळे तो एका आयपीएल हंगामात ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2016 साली विराट कोहलीने 4 शतके आणि 2022 साली जॉस बटलरने 4 शतके केली आहेत.

गुजरातने रचला धावांचा डोंगर

गुजरातने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 233 धावा केल्या. या आयपीएल प्लेऑफमध्ये केलेल्या सर्वोच्च धावा ठरल्या आहेत. गुजरातकडून गिलने साई सुदर्शनबरोबर 138 धावांची भागीदारी केली.

सुदर्शन 43 धावा करून रिटायर्ड आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याने नाबाद 28 धावांची खेळी केली, तर राशीद खान 5 धावांवर नाबाद राहिला. तसेच वृद्धिमान साहाने 18 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT