Aiden Markram Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: एक-दोन नाही, हैदराबादच्या कर्णधारानं पकडले मुंबईच्या तीन दिग्गजांचे कॅच, पाहा Video

Video: मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने तीन शानदार कॅच घेतले.

Pranali Kodre

Aiden Markram Three Catches: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 25 वा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करमने शानदार क्षेत्ररक्षण करताना तीन शानदार झेल घेतले.

या सामन्यात मार्करमने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्विकारत मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी चांगली सुरुवातही दिली. ते सुरुवातीपासूनच जवळपास १० ची धावगती ठेवून खेळत होते.

मात्र, पाचव्या षटकात टी नटराजनने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर रोहितने शॉट मारला. पण चेंडू मिड-ऑफला उडाला आणि तिथे असलेल्या मार्करमने हा सोपा झेल सहज घेतला. त्यामुळे रोहितला २८ धावांवर बाद होऊन माघारी परतावे लागले.

त्यानंतर ईशानला कॅमेरॉन ग्रीनने चांगली साथ दिली होती. त्यांची भागीदारीही चांगली रंगत होती. मात्र, 12 व्या षटकात मार्करमने मार्को यान्सिनकडे गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला. त्यानेही विश्वास कायम ठेवताना षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ईशानला चूक करण्यात भाग पाडले. ईशानने या चेंडूवर शॉट मारला, पण त्याच्याकडून तो योग्य बसला नाही. त्यावेळी मार्करम मिड-ऑफपासून मागे पळत गेला आणि त्याने हा झेल घेतला.

ईशान 38 धावांवर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता. त्याने फलंदाजीला आल्यानंतर एक षटकार मारला. मात्र, तो 12 व्या षटकातीलच पाचवा चेंडू खेळताना चूकला. त्यामुळे मिड-ऑफला मार्करमने हवेत सूर मारत त्याचा शानदार झेल घेतला. त्यामुळे सूर्यकुमार 7 धावा करून बाद झाला.

मार्करमने घेतलेल्या या झेलांचे सध्या कौतुक होत असून त्याच्या झेलांचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिय अकाउंट्सवरही शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, सूर्यकुमार बाद झाल्यानंतर तिलक वर्माने ग्रीनला चांगली साथ देताना 56 धावांची भागीदारी केली. पण तिलक 17 व्या षटकात 37 धावा करून बाद झाला. नंतर ग्रीन आणि टीम डेव्हिडने डाव पुढे नेला. मात्र डावाच्या अखेरच्या चेंडूवर डेव्हिड 16 धावांवर धावबाद झाला. पण ग्रीन 40 चेंडूत 64 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे मुंबईने 20 षटकात 5 बाद 192 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT