Hardik Pandya Record: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात राजस्थानने 3 विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठा वैयक्तिक विक्रम नावावर केला आहे.
या सामन्यात हार्दिकने गुजरातकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 19 चेंडूत 28 धावांची खेळी केली. तसेच त्याने गोलंदाजी करताना यशस्वी जयस्वालची महत्त्वाची विकेट घेतली. त्यामुळे या सामन्यात हार्दिकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 2000 धावा पूर्ण करण्याबरोबरच 50 विकेट्सचा टप्पाही गाठला.
त्याने आता आयपीएल कारकिर्दीत 111 सामन्यांमध्ये 8 अर्धशतकांसह 2012 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 51 विकेट्स घेतल्या आहेत.
त्यामुळे तो आयपीएलमध्ये 2000 धावा आणि 50 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणारा एकूण सहावा खेळाडू आणि दुसराच भारतीय ठरला आहे. हार्दिकपूर्वी रविंद्र जडेजा या भारतीय खेळाडूने अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे. जडेजाने आयपीएलमध्ये 2531 धावा केल्या असून 138 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच शेन वॉटसन, जॅक कॅलिस, कायरन पोलार्ड आणि आंद्रे रसेल या परदेशी खेळाडूंनीही आयपीएलमध्ये 2000 धावा आणि 50 विकेट्स घेण्याची अष्टपैलू कामगिरी केली आहे.
रविंद्र जडेजा - 2531 धावा आणि 138 विकेट्स
हार्दिक पंड्या - 2012 धावा आणि 51 विकेट्स
शेन वॉटसन - 3874 धावा आणि 92 विकेट्स
जॅक कॅलिस - 2427 धावा आणि 65 विकेट्स
आंद्रे रसेल - 2095 धावा आणि 92 विकेट्स
कायरन पोलार्ड - 3412 धावा 69 विकेट्स
दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 45 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पंड्याशिवाय अभिनव मनोहर आणि साई सुदर्शन यांनीही 20 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे गुजरातने 20 षटकात 7 बाद 177 धावा केल्या. राजस्थानकडून संदीप शर्माने 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर राजस्थानने 19.2 षटकात 7 बाद 179 धावा करत हा सामना सहज जिंकला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने ३२ चेंडूत ६० धावांची खेळी केली. तसेच शिमरॉन हेटमायरने 26 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.