IPL 2023: RCB च्या होम ग्राऊंडवर धोनीच्या CSK चा रोमांचक विजय! मॅक्सवेल-डुप्लेसिसच्या झंझावाती खेळीवर फेरले पाणी

IPL 2023 चा 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि RCB यांच्यात खेळला गेला.
csk
cskDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 चा 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि RCB यांच्यात खेळला गेला. चेन्नईने या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने 227 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

प्रत्युत्तरात आरसीबीने 20 षटकांत 8 गडी गमावून 218 धावा केल्या. बंगळुरुकडून ग्लेन मॅक्सवेल (36 चेंडूत 76) आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस (33 चेंडूत 62) यांनी शानदार खेळी खेळली. तर चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक 3 बळी घेतले. पाथीरानाने दोन बळी घेतले.

CSK ने 227 धावा केल्या

तत्पूर्वी, CSK ने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 226 धावा केल्या. नाणेफेक हरल्यानंतर सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकात ऋतुराज गायकवाड (2) बाद झाला.

डेव्हॉन कॉनवे (45 चेंडूत 83) ने दुसऱ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणे (20 चेंडूत 37) सोबत 74 धावांची भागीदारी केली. रहाणे 10व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर कॉनवेने शिवम दुबे (27 चेंडूत 52) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली.

कॉनवेने 16व्या षटकात आपली विकेट गमावली तर दुबेने 17व्या षटकात विकेट गमावली. अंबाती रायुडूने 17 आणि रवींद्र जडेजाने 10 धावांचे योगदान दिले.

मोईन अली 19 आणि एमएस धोनीने 1 धावा करुन नाबाद राहिला. आरसीबीमार्फत मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, हर्षल पटेल, वनिंद हसरंगा, ग्लेन मॅक्सवेल आणि वैशाख यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

csk
IPL 2023: हार्दिकची RR विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी, 'हा' विक्रम करणारा जडेजानंतरचा दुसराच ऑलराऊंडर

विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांनी लवकर विकेट गमावल्या, फॅफने मॅक्सवेलसह डाव सावरला

237 धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही.

संघाला पहिला मोठा धक्का पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीच्या रुपाने 6 धावांवर बसला, जो आकाश सिंगच्या गोलंदाजीवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर आरसीबीला 15 धावांवर दुसरा धक्का महिपाल लोमरोरच्या रुपाने बसला, जो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

फाफ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 61 चेंडूत 126 धावांची शानदार शतकी भागीदारी झाली. ग्लेन मॅक्सवेल 36 चेंडूंत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्याचवेळी फाफ डू प्लेसिसही 33 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. 159 धावांवर आरसीबीने 4 विकेट गमावल्या होत्या.

दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे.

चेन्नई सुपर किंग्जकडे रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर आणि मोईन अलीसारखे शानदार फिरकीपटू आहेत. चमकदार गोलंदाजीसोबतच जडेजा आणि अली फलंदाजीतही निष्णात आहेत.

दुसरीकडे, आरसीबीकडे उत्कृष्ट फलंदाज आहेत. विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिस उत्कृष्ट लयीत दिसत आहेत. ग्लेन मॅक्सवेलही चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

csk
IPL 2023 च्या वेळापत्रकात बदल, LSG vs CSK सामन्यापूर्वी घेतला मोठा निर्णय

दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी सीएसकेच्या संघाने 19 सामने जिंकले आहेत.

त्याचवेळी, आरसीबी संघाने केवळ 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com