SRH vs MI Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: तिसऱ्या विजयासाठी हैदराबाद-मुंबई सज्ज, पाहा दोन्ही टीमच्या Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेत मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना होत आहे.

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी 25 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होत आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जेसन बेऱ्हेंडॉर्फचे पुनरागमन झाले आहे. मागील सामन्यात त्याला बरे नसल्याने तो खेळला नव्हता. पण आता तो बरा असल्याने खेळणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले आहे. त्याला ड्युआन यान्सिनच्या जागेवर संधी मिळाली आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.

या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन आणि जेसन बेऱ्हेनडॉर्फ या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार मार्करमबरोबरच हॅरी ब्रूक, हेन्रिक क्लासेन आणि मार्को यान्सिन या चार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीनच परदेशी खेळाडू खेळवले असल्याने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी किंवा भारतीय खेळाडूचा समावेश करू शकतात. पण हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूचाच वापर करता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी मुंबई इंडियन्सने राखीव खेळाडूंमध्ये रिली मेरेडिथ, रमनदीप सिंग, कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी आणि विष्णू विनोद यांची निवड केली आहे. सनरायझर्स हैदराबादने राखीव खेळाडूंमध्ये अब्दुल सामद, विवरांत शर्मा, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर आणि उमरान मलिक यांना संधी दिली आहे.

दरम्यान, हा सामना दोन्ही संघांसाठी या हंगामातील पाचवा सामना आहे. या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत या हंगामात प्रत्येकी २ विजय आणि २ पराभव स्विकारले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तिसऱ्या विजयासाठी आज उत्सुक असतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • सनरायझर्स हैदराबाद - मयंक अगरवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सिन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला, जेसन बेऱ्हनडॉर्फ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Goa Assembly Live: धार्मिक आणि व्यवहारिक भाषा ही 'मराठी' - आमदार जीत

Mapusa heavy rain: म्हापशात दाणादाण! मुसळधार पावसानं झोडपलं; 24 तासांत 4 इंच पाऊस, रस्ते पाण्याखाली

Horoscope: 'या' 3 राशींवर आज धनवर्षा होणार! लक्ष्मीमातेच्या कृपेमुळे लाभच लाभ

Goa: पालिकांच्या विकासाला चालना देणारे विधेयक विधानसभेत सादर, 'अ' वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या 25 वरून 27 होणार

SCROLL FOR NEXT