IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात अशी घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याबद्दल जाणून घेऊया.
चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 20 वे षटक हर्षल पटेलने टाकले, पण त्याला सामन्याच्या मध्यातच गोलंदाजी करण्यापासून रोखण्यात आले.
20 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजाने 1 धाव घेतली. त्यानंतर त्याने दुसरा चेंडू मोईन अलीला टाकला, जो कमरेच्या वर होता (बीमर बॉल).
अम्पायरने त्याला नो बॉल म्हटले, त्यावर आरसीबीने रिव्ह्यू घेतला, पण मैदानावरील अम्पायरचा निर्णय योग्य मानला गेला. त्यानंतर फ्री हिटवर, सीएसकेला लेग बाय म्हणून एक धाव मिळाली. यानंतर हर्षल पटेलने (Harshal Patel) वाईड बॉल टाकला.
तसेच, हर्षल पटेलने तिसरा चेंडू मोईन अलीला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो कमरेच्या उंचीवरुन गेला, ज्यावर CSK संघाने DRS घेतला आणि त्याला नो बॉल घोषित केले. अशाप्रकारे, षटकात दोन नो बॉल (बीमर बॉल) टाकल्यामुळे हर्षलला गोलंदाजी करण्यापासून रोखण्यात आले आणि त्याच्या जागी ग्लेन मॅक्सवेलने षटक पूर्ण केले.
हर्षल पटेल सीएसकेविरुद्ध सपशेल अपयशी ठरला. त्याने 3.2 षटकात 36 धावा दिल्या आणि फक्त एक विकेट मिळाली.
खरेतर, क्रिकेटच्या नियम 41.7.1 नुसार- “पिचिंगशिवाय पॉपिंग क्रीझवर उभ्या असलेल्या फलंदाजाच्या कमरेच्या उंचीवरुन जाणारा कोणताही चेंडू अयोग्य मानला जातो. जेव्हाही असा चेंडू टाकला जातो तेव्हा अम्पायर त्याला नो बॉल म्हणतील.”
नियम 41.7.4 नुसार- "त्या डावात असे दोन धोकादायक चेंडू एकाच गोलंदाजाने टाकले असतील तर, अम्पायरने कर्णधाराला कळवल्यानंतर गोलंदाजाला गोलंदाजी करण्यापासून रोखले जाईल."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.