Lucknow Super Giants Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, SRH vs LSG: हैदराबाला अभिषेकची 31 धावांची ओव्हर नडली! लखनऊचा दणदणीत विजय

SRH vs LSG: शनिवारी आयपीएल २०२३ स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने अखेरच्या षटकात सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध विजय मिळवला.

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात 58 वा सामना पार पडला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊने अखेरच्या षटकात 7 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात हैदराबादने लखनऊसमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी लखनऊच्या फलंदाजांवर चांगले नियंत्रण ठेवले होते. मात्र अभिषेक शर्माने टाकलेले 16 वे षटक हैदराबादला चांगलेच महागात पडले.

या षटकात मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी मिळून 5 षटकार मारले. या षटकात स्टॉयनिसची विकेटही गेली. पण या षटकात एकूण 31 धावा निघाल्या. त्यामुळे हा सामना लखनऊच्या बाजूने झुकला. त्यानंतर लखनऊने 183 धावांचे आव्हान 19.2 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

या सामन्यात 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी लखनऊकडून काईल मेयर्स आणि क्विंटन डी कॉक यांची जोडी उतरली होती. मात्र मेयर्स 2 धावांवर माघारी परतला. पण यानंतर डी कॉक आणि प्रेरक मंकड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात डी कॉकने 29 धावांवर विकेट गमावली.

असे असले तरी प्रेरक मंकडला मार्कस स्टॉयनिसची साथ मिळाली. या दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली. ही भागीदारी करत असतानाच 16 व्या षटकात स्टॉयनिसने अभिषेक शर्माच्या पहिल्या तीन चेंडूत षटकार ठोकले. या तीन चेंडूतील एक चेंडू वाईडही ठरला. पण चौथ्या चेंडूवर स्टॉयनिस 40 धावांवर बाद झाला.

असे असले तरी नंतर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने अभिषेकच्या गोलंदाजीवर अखेरच्या दोन चेंडूंवरही षटकार ठोकले. त्यामुळे या षटकात 31 धावा निघाल्या. त्यानंतरही पूरनने त्याचा आक्रमक अंदाज कायम ठेवला.

यादरम्यान प्रेरक मंकडने अर्धशतक पूर्ण केले. मंकड आणि पूरनने लखनऊला सहज विजय मिळवून दिला. मंकड 45 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 64 धावा करून नाबाद राहिला. तसेच पूरन 3 चौकार आणि 4 षटकारांसह 13 चेंडूत 44 धावांवर नाबाद राहिला.

हैदराबादकडून ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. सलामीवीर अभिषेक शर्माने तिसऱ्याच षटकात 7 धावांवर विकेट गमावली होती. पण नंतर अनमोलप्रीत सिंग आणि राहुल त्रिपाठी यांनी डाव सांभाळला. पण चांगल्या सुरुवातीनंतरही या दोघांना मोठी खेळी करता आली नाही.

सहाव्या षटकात त्रिपाठी 20 धावा करून बाद झाला, तर अनमोलप्रीत 9 व्या षटकात 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर चांगल्या लयीत खेळणाऱ्या कर्णधार एडन मार्करमला लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्याने 13 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चूक करण्यास भाग पाडले. त्यामुळे मार्करम 28 धावांवर यष्टीरक्षक क्विंटन डीकॉककडून यष्टीचीत झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्सला शुन्यावर पंड्याने त्रिफळाचीत केले.

मात्र यानंतर हेन्रिक क्लासेन आणि अब्दुल सामद यांची जोडी जमली. क्लासेन आक्रमक खेळत असताना त्याला सामदने चांगली साथ दिली होती. मात्र, 19 व्या षटकात क्लासेनची लय बिघडली आणि तो आवेश खानविरुद्ध खेळताना प्रेरक मंकडकडे झेल देत बाद झाला.

क्लासेनने 29 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावांची खेळी केली. अखेरीस सामद 25 चेंडूत 37 धावांवर नाबाद राहिला, तर भुवनेश्वर कुमार 2 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे हैदराबादला 20 षटकात 6 बाद 182 धावा करता आल्या.

लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच युधवीर सिंग चरक, आवेश खान, यश ठाकूर आणि अमित मिश्रा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT