SRH vs KKR Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: जेसन रॉयचं कोलकाता टीममध्ये कमबॅक! हैदराबादमध्ये रंगणार मॅच, पाहा Playing XI

आयपीएल २०२३ मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होत आहे.

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होत आहे. हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानावर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यातून जेसन रॉयचे कोलकाता संघात पुनरागमन झाले आहे. त्याला डेव्हिड विसेऐवजी संधी मिळाली आहे. तसेच वैभव अरोराला एन जगदिशनच्या जागेवर संधी मिळाली आहे. याशिवाय हैदराबाद संघात कार्तिक त्यागीचा अंतिम 16 जणांमध्ये पुनरागमन झाले आहे.

या सामन्यासाठी कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रेहमनुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण या चार परदेशी खेळाडूंना संधी मिळाली आहे, तर सनरायझर्स हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार एडन मार्करमबरोबरच हेन्रिक क्लासेन, मार्को यान्सिन आणि हॅरी ब्रुक या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूंनाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये कोलकाताने सुयश शर्मा, अनुकूल रॉय, एन जगदिशन, लॉकी फर्ग्युसन आणि कुलवंत खेजरोलिया यांना संधी दिली आहे, तसेच हैदराबादने राहुल त्रिपाठी, विवरांत शर्मा, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी आणि सन्वीर सिंग यांना राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • सनरायझर्स हैदराबाद - मयंक अगरवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को यान्सिन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, टी नटराजन

  • कोलकाता नाईट रायडर्स - रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT