KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Akash Deep ruled out of IPL 2026: आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे.
Akash Deep ruled out of IPL 2026
Akash Deep ruled out of IPL 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून अत्यंत निराशाजनक बातमी समोर आली आहे. संघाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे आधीच स्पर्धेबाहेर गेला असताना, आता भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आकाश दीप देखील आगामी हंगामात खेळू शकणार नाही. वेगवान गोलंदाजांच्या दुखापतींच्या सत्रामुळे केकेआरच्या गोलंदाजीची फळी पूर्णपणे विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

केकेआर वृत्ताला दुजोरा

'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, बंगालचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीप या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. केकेआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, "दुर्दैवाने आकाश दीप आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे. तो या पूर्ण हंगामात उपलब्ध नसेल." गेल्या वर्षी अबू धाबी येथे झालेल्या लिलावात केकेआरने आकाश दीपला त्याच्या १ कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केले होते. हर्षित राणाच्या अनुपस्थितीत आकाश दीपवर गोलंदाजीची मोठी जबाबदारी असणार होती, मात्र आता त्याच्या जाण्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.

Akash Deep ruled out of IPL 2026
Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

आकाश दीप सध्या बेंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सीलेंस' (COE) मध्ये आपल्या दुखापतीवर उपचार घेत आहे (रिहॅब). १८ मार्चपासून कोलकाता येथे केकेआरचे सराव शिबिर सुरू झाले आहे, मात्र आकाश दीप या शिबिरात सहभागी होऊ शकला नव्हता. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र, तो या हंगामात खेळण्यासाठी फिट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आकाश दीपसाठी दुखापतींचे हे सत्र नवीन नाही; २०२२ मध्ये पदार्पण केल्यापासून तो आतापर्यंत केवळ १४ आयपीएल सामने खेळू शकला आहे.

Akash Deep ruled out of IPL 2026
Goa HSSC Result 2026: काऊंटडाऊन सुरू! अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल; 'या' सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट

गोलंदाजीच्या पर्यायांची वानवा

केकेआरसाठी केवळ भारतीय गोलंदाजच नाही, तर परदेशी गोलंदाजांची तंदुरुस्ती देखील चिंतेचा विषय ठरली आहे. श्रीलंकेचा मथीषा पथिराना अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. अशा परिस्थितीत, दोन प्रमुख भारतीय गोलंदाज बाहेर गेल्यामुळे आता केकेआर कोणाला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएलमध्ये १० च्या वर इकॉनमी रेट असूनही, आकाश दीपचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरणार होता, पण आता संघाला नव्या रणनीतीसह मैदानात उतरावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com