Virat Kohli - Anushka Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: लाईव्ह मॅचमध्ये विराटचा रोमँटिक अंदाज! अनुष्काला फ्लाइंग किस देताना Video व्हायरल

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा प्रभारी कर्णधार विराटचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला.

Pranali Kodre

Virat Kohli giving flying kiss to Anushka Sharma: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात बेंगलोरने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 7 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात विराटचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळाला.

या सामन्यात विराटला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. तो डावाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर बाद झाला. पण नेतृत्व आणि क्षेत्ररक्षणात मात्र, विराटने चमक दाखवली. त्याने शानदार नेतृत्व करण्याबरोबरच दोन महत्त्वाचे झेलही घेतले.

या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने जोस बटलरची विकेट पहिल्याच षटकात गमावली होती. मात्र, त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सांभाळताना दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 98 धावांची भागीदारी केली.

पण ही भागीदारी 12 व्या षटकात हर्षल पटेलने पडिक्कलला 52 धावांवर बाद करत तोडली. त्याचा झेल विराटने लाँग-ऑनच्या क्षेत्रात घेतला. त्यानंतर हर्षल पटेलनेच 14 व्या षटकात जयस्वालला देखील बाद केले. जयस्वालचा झेलही विराटने लाँग-ऑनलाच सहज घेतला.

हा झेल घेतल्यानंतर मात्र, विराटने खास अंदाजात सेलिब्रेशन केले. त्याने स्टेडियममध्ये त्याला आणि बेंगलोरला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या त्याच्या पत्नी अनुष्का शर्माकडे पाहून फ्लाईंग किस दिले. त्याने अनुष्काला फ्लाईंग किस देत असतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहा

बेंगलोरने जिंकला सामना

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 189 धावा केल्या होत्या. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तसेच फाफ डू प्लेसिसने 62 धावांची खेळी केली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 6 बाद 182 धावाच करता आल्या. राजस्थानकडून देवदत्त पडिक्कलने 52 धावांची खेळी केली, तर यशस्वी जयस्वालने धावा केल्या. तसेच ध्रुव जुरेलने 34 धावांची नाबाद खेळी केली. तसेच बेंगलोरकडून हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Viral Video: 'एक्सप्रेस'वे वर थरार! नव्या कारच्या सेलिब्रेशनचा जीवघेणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलाय का?

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT