RCB vs MI Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: RCB ने जिंकला टॉस, मुंबईकडून आर्चरचं पदार्पण! पाहा दोन्ही संघांचे Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात रविवारी होत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना या दोन्ही संघांचा चालू आयपीएल हंगामातील पहिलाच सामना आहे. या सामन्यातून मुंबई इंडियन्सकडून जोफ्रा आर्चरने पदार्पण केले आहे. तसेच मुंबई इंडियन्सने आर्चरव्यतिरिक्त टीम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

दरम्यान, मुंबईने तीनच परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली असल्याने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून एका परदेशी खेळाडूचा नंतर सामन्यात सामील करू शकतात.

त्याचशिवाय आरसीबीने कर्णधार फाफ डू प्लेसिसशिवाय ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल आणि रीस टोपली या चार परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. या सामन्यातून ब्रेसवेलने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

दरम्यान आरसीबीने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडूंना संधी दिलेली असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच संघात सामील करू शकतात.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, रीस टोपले, मोहम्मद सिराज

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT