Virat Kohli | Faf du Plessis Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: चक्क RCBचा कर्णधारच म्हणाला 'ए साला कप नही', शेजारी बसलेल्या विराटही आवरेना हसू

IPL 2023: आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने चुकून 'ए साला कप नही' म्हणताच विराटही खळखळून हसतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Faf du Plessis misquoted a slogan of RCB: इंडियन सुपर लीग 2023 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघ विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. काही संघातील खेळाडू याच स्पर्धेनिमित्त विविध कार्यक्रमातही सहभागी झाल्याचे दिसले आहेत. दरम्यान अशाच एक कार्यक्रमादरम्यान फाफ डू प्लेसिसने चूकीचं वाक्य बोलल्यानंतर विराट कोहलीला हसू अनावर झालं होतं.

झाले असं की रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि स्टार फलंदाज एक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी आरसीबीचे घोषवाक्य फाफला बोलायचे होते. पण त्याने ते वाक्य चूकिचे बोलले. आरसीबीचे खरे घोषवाक्य 'ए साला कप नामदे' असे आहे.

पण फाफने 'ए साला कप नही' असं म्हटलं. ते ऐकून त्याच्या शेजारी बसलेल्या विराटला हसू आवरता आले नाही आणि तो खळखळून हसला. त्यानंतर त्याने फाफला घोषवाक्य सुधारून सांगितले. चूक लक्षात आल्यावर फाफही हसू लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, 'ए साला कप नामदे' या घोषवाक्याचा अर्थ होतो की यावर्षी कप आपलाच आहे.

आरसीबी विजेतेपदाच्या प्रतिक्षेत

खरंतर आरसीबी पहिल्या आयपीएल हंगामापासून स्पर्धा करत आहेत. ते विजेतेपदाच्या अनेकदा जवळही पोहोचले आहेत, मात्र अद्याप त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे सध्या आरसीबीचे चाहतेही विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असून आशा करत आहेत की यंदा आरसीबी पहिले आयपीएल विजेतेपद जिंकेल.

आरसीबी संघ आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या 15 आयपीएल हंगामापैकी 8 वेळा प्लेऑफमध्ये गेले आहेत. तसेच 2009, 2011 आणि 2016 या तीन वर्षी आरसीबीने अंतिम सामन्यातही प्रवेश केला आहे. पण त्यांना तिन्ही वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

आरसीबी तीन वर्षांनी खेळणार घरच्या मैदानात

आयपीएल 2023 च्या पहिल्या सुपर संडेला (2 एप्रिल) दोन सामने होणार आहेत. यातील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असून हे आरसीबीचे घरचे मैदान देखील आहे.

आरसीबी तीन वर्षांनंतर घरच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. गेल्या तीन वर्षात कोरोनाच्या कारणाने आरसीबीला आयपीएलचा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळता आला नव्हता. त्यामुळे आता घरच्या प्रेक्षकांसमोर आरसीबी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाचे आव्हान कसे पेलणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT