
पणजी: चित्रपटाद्वारे भारताचा इतिहास उलघडून दाखवण्याची परंपरा सातत्याने वाढत आहे. या मालिकेत आता गोव्यातील कॅथलिक मंत्र्यांने उडी घेतली आहे. मंत्री माविन गुदिन्हो यांनी राम मंदिराच्या इतिहासावर आधारीत चित्रपट बनविण्याची तयारी दर्शवली आहे. अयोध्या: द फायनल आर्ग्युमेंट या चित्रपटातून राम मंदिराचा इतिहास उलघडा जाणार आहे. असे वृत्त एका हिंदी वाहिनीने प्रसिद्ध केले आहे.
हिंदी वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या: द फायनल आर्ग्युमेंट हा चित्रपट अयोध्येतील राम मंदिराच्या चाललेल्या दीर्घ कायदेशीर लढाईवर आधारित असेल. राम मंदिराचा वाद कसा सुरू झाला आणि २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अखेर कोणता ऐतिहासिक निर्णय दिला हे यात दाखवले जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री माविन गुदिन्हो सध्या हा चित्रपट पुढे नेण्यासाठी बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि कलाकारांना भेटत आहेत. गुदिन्हो हा चित्रपट वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने लोकांसमोर सादर करू इच्छितात.
राम मंदिरावरील हा चित्रपट तीन वर्षांच्या संशोधनावर आधारित आहे, ज्यामध्ये ६,७०० पानांचे न्यायालयीन रेकॉर्ड आणि ४२ पुस्तकांचा अभ्यास करण्यात आला आहे.
अयोध्या: द फायनल आर्ग्युमेंट चित्रपटात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वैध असलेले पुरावे दाखवले जातील. हा चित्रपट इतिहास, श्रद्धा, कायदा आणि भावना एकत्र करून देशाच्या आत्म्याशी जोडलेली भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी कायदेशीर लढाईची कहाणी दाखवली जाईल.
अयोध्येतील रामजन्मभूमीत सुमारे ५०० वर्षांच्या संघर्षानंतर, २७ वर्षे तंबूत राहणाऱ्या रामलल्लाला अखेर २०२४ मध्ये भव्य मंदिर मिळाले. भगवान श्री राम यांची प्राण प्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आली. या मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.