Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Goa Today's 12 July 2025 Live News: गोव्यातील राजकारण, गुन्हे, अपघात, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
Goa News Live Updates
Goa News Live UpdatesDainik Gomantak

पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

पणजीला भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एकाचा किताब मिळाला आहे. स्मार्ट सिटी पणजीला स्वच्छता, स्वच्छता आणि शाश्वत शहरी विकासातील कामगिरीची दखल घेत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये प्रतिष्ठित राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाईलवर नको, मैदानावर खेळा

मोबाईलवर खेळण्‍यापेक्षा मैदानावर जाऊन खेळा. त्‍यामुळे शरीर सदृढ होईल. मोबाईलचा वापर चांगल्‍या कामांसाठीच करा : मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

"विद्यार्थ्यांना मारणं हा उपाय नाही; शिक्षकांनी सभ्यतेने शिकवलं पाहिजे" मुख्यमंत्री

कधीकधी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या जातात हे दुःखद आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणे हा योग्य मार्ग नाही. शिक्षकांनी त्यांच्याशी सभ्यतेने बोलावे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास मदत करावी. शिक्षणमंत्री म्हणून, अशा तक्रारी येतात तेव्हा मला वाईट वाटते: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बालरथ केवळ ३ कि.मीतील विद्यार्थ्यांसाठी

केवळ ३ कि.मी परिसरातील विद्यार्थ्यांना आणण्‍यासाठीच शाळांना बालरथ देण्‍यात आले आहेत. अनुदानित शैक्षणिक संस्‍थांनी या नियमांचे उल्लंघन करू नये. ज्‍या शाळांना आवश्‍यकता आहे, त्‍यांना बालरथ पुरवू : डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

साखळी रविद्र भवनात कृष्णबट्ट बांदकरांच्या तैलचित्राचे अनावरण

गोमंतक रंगभूमी दिना निमित्त साखळी रविद्र भवनात गोमंतकीय आद्य नाटककार कृष्णभट्ट बांदकर यांच्या तैलचित्राचे प्रसिद्ध मराठी अभिनेत सुबोध भावे यांच्या हस्ते अनावरण. ह्याप्रसंगी मुख्यमंत्र्याच्या सौभाग्यवती सुलक्षणा सावंत, रविद्र भवनचे उपाध्यक्ष विशांत (आबा) चिमुलकर, संचालक रविराज च्यारी व इतरांची होती उपस्थिती. सुबोध भावे यांच्या हस्ते साखळीतील दोन ज्येष्ठ कलाकरांचाही सन्मान.

पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह वाळपई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संशयिताकडून चार चाकी वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अधिकची कायदेशीर कारवाई सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयित गांजा, ड्रग्ज व्यवहारात सराईत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्याला अनेकवेळा अटक करण्यात आली होती.

अवैध वास्तव्य प्रकरणी मांद्रे पोलिसांकडून युगांडाच्या नागरिकाला अटक

गोव्यात अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी युगांडाच्या ३९ वर्षीय नागरिकाला अटक केली आहे. वैध कागदपत्रांशिवाय हा नागरिक मुदत समाप्त झाल्यानंतर देखील गोव्यात वास्तव्य करत होता. हरमल येथील खालचावाडा परिसरात त्याचे वास्तव्य होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com