Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Vasco Khariwada Fish Market: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्रीला मार्केटातील मासळी विक्रेत्यांनी हरकत घेऊन इशारा दिल्यावर तेथे मासळी विक्री होऊ नये यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
Vasco Khariwada wholesale fish sale issue
Vasco Khariwada wholesale fish sale issueDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्रीला मार्केटातील मासळी विक्रेत्यांनी हरकत घेऊन इशारा दिल्यावर तेथे मासळी विक्री होऊ नये यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे मार्केटातील मासे विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि बऱ्याच ग्राहकांनी मात्र नापसंती व्यक्त केली आहे.

येथील मासे मार्केटाची नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.येणाऱ्या काही दिवसांत सदर मासळी मार्केटचे उद्‍घाटन होणार आहे. तथापी खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्री बंद करावी. अन्यथा आम्ही त्या नवीन मार्केटात मासे विक्री न करता रस्त्यारच मासे विक्री करू असा इशारा मार्केटातील विक्रेत्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे खारीवाडा येथील त्या विक्रेत्यांकडून होणारी मासळी विक्री पोलिसांच्या सहाय्याने बंद करण्यात आली आहे. गेले काही दिवस तेथे चार-पाच पोलिस तैनात असतात.

Vasco Khariwada wholesale fish sale issue
Rapan Fishing: रापण ओढा रे! शेकडो वर्षांपासून उधाणलेला समुद्र, ढगाळ आकाशाखाली होणारी पारंपरिक मासेमारी पद्धत

ते तेथे मासे विक्री होणार नाही, याची दक्षता घेतात. मासळी विक्री बंद करण्यात आल्याने ग्राहकांनी आश्र्चर्य व्यक्त केले आहे. तेथे स्वस्त दरात व वजन पध्दतीने मासे विक्री होत असल्याने ग्राहक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तेथे लहान मोठे मासे मिळत असल्याने ग्राहकांची मोठी सोय होत असे. त्या विक्रेत्यांच्या मते ते घाऊक दराने मासे विक्री करत नाही. ते वाटा घालण्याऐवजी वजनाने ग्राहकांना मासे विक्री करतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही.

Vasco Khariwada wholesale fish sale issue
Vasco: मच्छिमार समस्येच्या गर्तेत! बोटी लावायलाही अपुरी जागा; वास्कोतील खारीवाडा जेटी अडचणींनी ग्रस्त

गेले काही दिवस मासळी विक्री ठप्प

तथापि खारीवाडा येथे घाऊक मासे विक्री होत असल्याने मार्केटात मासे विकत घेण्यासाठी ग्राहक फिरकत नाहीत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचा दावा मार्केटातील मासळी विक्रेत्या करतात. यापूर्वीही खारीवाडा येथील घाऊक मासे विक्रेत्यांविरोधात कारवाया झाल्या होत्या. तथापि काही दिवसांनंतर तेथे पुन्हा मासे विक्री सुरु झाली होती. यावेळी तेथे सतत पोलिस तैनात करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून तेथील मासेविक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com