Faf du Plessis Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: RCBच्या पराभवानंतर कॅप्टन डू प्लेसिसला लाखांचा दंड; आवेश खानलाही फटकारले

सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात झालेल्या सामन्यानंतर फाफ डू प्लेसिसला दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी (10 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात लखनऊने 1 विकेटने रोमांचक विजय मिळवला. दरम्यान या अटीतटीच्या सामन्यानंतर दोन्ही संघांना काही गोष्टींमुळे फटकारण्यात आले आहे.

आरसीबीच्या कर्णधाराला दंड

या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतरही आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसवर दंडाची कारवाई झाली आहे. कारण आरसीबी संघाकडून षटकांची गती कमी राखण्यात आली होती. आरसीबीचा संघ निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण करू न शकल्याने त्यांना 12 लाख रुपयांचा दंड झाला आहे.

आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे की आयपीएलच्या आचार संहितेच्या नुसार षटकांची गती कमी राखण्याची चूक आरसीबीकडून या हंगामात पहिल्यांदाच झाली आहे. त्यामुळे कर्णधार फाफ डू प्लेसिसला 12 लाखांच्या दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

आवेश खानलाही फटकारले

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सने सामना जिंकल्यानंतर आवेश खानने विजयाचे आक्रमक सेलिब्रेशन केले होते. अखेरच्या चेंडूवर लखनऊला 1 धावेची गरज असताना रबी बिश्नोई आणि आवेश खान यांनी धावून एकेरी धाव काढली. त्यानंतर आवेशने विजय मिळवल्याचा आनंद साजरा करताना हेल्मेट जमिनीवर फेकले होते.

त्यामुळे त्याला आयपीएलच्या आचार संहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्या प्रकरणी फटकारले आहे. आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की आवेशने आयपीएलच्या आचार संहितेतील लेव्हल 1 मधील कलम 2.2 नियमाचे उल्लंघन केले आहे. लेव्हल 1 चे उल्लंघन केल्यानंतर सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

लखनऊचा विजय

दरम्यान या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात 2 बाद 212 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर लखनऊने पहिल्या तीन विकेट्स लवकर गमावल्यानंतरही मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे सामना जिंकण्यात यश मिळवले.

दरम्यान, हे दोघे बाद झाल्यानंतर आरसीबीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर लखनऊला 213 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात यश आले. याच सामन्यात पूरनने 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण करण्याचा कारनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT