राशिद खान IPL मध्ये Hat-Trick घेणारा तब्बल 19 वा खेळाडू, पाहा रेकॉर्डची संपूर्ण लिस्ट

आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणाऱ्या सर्व खेळाडूंबद्दल जाणून घ्या.
Rashid Khan
Rashid KhanDainik Gomantak
Published on
Updated on

IPL Hat-Trick: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना पार पडला. सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 3 विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी या सामन्यात गुजरातचे प्रभारी कर्णधारपद सांभाळणाऱ्या राशिद खानने देखील विकेट्सची हॅट्रिक घेत सर्वांचे लक्ष वेधले होते.

या सामन्यात गुजरातने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला अखेरच्या 5 चेंडूत 28 धावांची गरज होती. पण रिंकू सिंगने सलग 5 षटकार मारत केकेआरला विजय मिळवून दिला. पण त्याआधी या सामन्यात गुजरातचा राशिद खानने हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.

या सामन्यात केकेआरच्या वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांच्या विकेट्स गेल्यानंतर 17 व्या षटकात गोलंदाजी करताना राशिदने पहिल्याच चेंडूवर धोकादायक आंद्रे रसलला एका धावेवर बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर सुनील नारायण, तर तिसऱ्या चेंडूवर राशिदने शार्दुल ठाकूरला बाद केले. त्यामुळे राशिदने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये हॅट्रिक साजरी केली.

राशिदच्या या हॅट्रिकने गुजरातला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. मात्र, अखेरच्या षटकात रिंकूच्या तुफानी खेळीमुळे केकेआरने गुजरातवर मात केली.

Rashid Khan
IPL 2023: पंजाबच्या सेनापतीचा 'वन मॅन शो'! धवन @99 नॉटआऊट, 'या' खेळाडूंही केलाय असा अनोखा विक्रम

दरम्यान, राशिद आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा एकूण 19 वा खेळाडू ठरला आहे. तसेच आयपीएल 2023 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू आहे. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात 12 भारतीय खेळाडूंनी आणि 6 परदेशी खेळाडूंनी हॅट्रिक घेतली आहे. राशिद आयपीएल हॅट्रिक घेणारा सातवा परदेशी खेळाडू आहे.

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये एकापेक्षा अधिकवेळा हॅट्रिक आत्तापर्यंत अमित मिश्रा आणि युवराज सिंग या दोनच खेळाडूंना घेता आली आहे. अमितने तर तब्बल तीनवेळा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आहे. त्याने 2008 आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध, 2011 आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून डेक्कन चार्जर्सविरुद्धच आणि २०१३ साली सनरायझर्स हैदराबादकडून पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे.

तसेच युवराजने 2009 आयपीएलमध्येच दोनवेळा हॅट्रिक घेण्याची कमाल केली आहे. त्याने त्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि डेक्कन चार्जर्स संघांविरुद्ध विकेट्सची हॅट्रिक घेतली होती.

Rashid Khan
IPL 2023: घरच्या मैदानात RCB समोर केएल राहुलच्या LSG चं आव्हान, जाणून घ्या मॅचबद्दल सर्वकाही...

आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज

2008 - लक्ष्मीपती बालाजी (चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स)

2008 - अमित मिश्रा (दिल्ली कॅपिटल्स वि. डेक्कन चार्जर्स)

2008 - मखाया एन्टीनी (चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)

2009 - युवराज सिंग (पंजाब किंग्स वि.रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

2009 - युवराज सिंग (पंजाब किंग्स वि.डेक्कन चार्जर्स)

2009 - रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स वि. मुंबई इंडियन्स)

2010 - प्रविण कुमार (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स)

2011 - अमित मिश्रा (पंजाब किंग्स वि. डेक्कन चार्जर्स)

2012 - अजित चंडेला (राजस्थान रॉयल्स वि. पुणे वॉरियर्स इंडिया)

2013 - सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स)

2013 - अमित मिश्रा (सनरायझर्स हैदराबाद वि. पुणे वॉरियर्स इंडिया)

2014 - प्रविण तांबे (राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स)

2014 - शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद)

2016 - अक्षर पटेल (गुजरात लायन्स वि. पंजाब किंग्स)

2017 - एस बद्रिनाथ (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. मुंबई इंडियन्स)

2017 - अँड्र्यु टाय (गुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट)

2017 - जयदेव उनाडकट (रायझिंग पुणे सुपरजायंट वि. सनरायझर्स हैदराबाद

2019 - सॅम करन (पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स)

2019 - श्रेयस गोपाळ (रॉयल चॅलेंजरस बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स)

2021 - हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. मुंबई इंडियन्स)

2022 - युजवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स)

2023 - राशिद खान (गुजरात टायटन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com