Mohammed Shami Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Purple Cap: 68 सामन्यांनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत मोहम्मद शमी नंबर 1, पाहा टॉप 5 गोलंदाजांची लिस्ट

IPL 2023: गुजरातचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 68 सामन्यांनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे.

Manish Jadhav

IPL 2023 Purple Cap: आयपीएल 2023 आता अंतिम टप्प्यात आहे. या लीगचे 68 सामने झाले आहेत. गुजरातचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 68 सामन्यांनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे.

त्याने 13 सामन्यात एकूण 23 विकेट घेतल्या आहेत. या यादीत पहिल्या पाचमध्ये चार भारतीय गोलंदाज आहेत. विशेष म्हणजे, चार गोलंदाज फिरकीपटू आहेत.

दरम्यान, पर्पल कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्सचा स्टार फिरकीपटू रशीद खान 23 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) 13 सामन्यांत 21 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीतील इतर गोलंदाज कोण आहेत ते पाहा.

या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज

23- मोहम्मद शमी (GT) सामना 13

23- राशिद खान (GT), सामना 13

21- यजुवेंद्र चहल (आरआर), सामना 13

20- पियुष चावला (MI) सामना 13

19- वरुण चक्रवर्ती (केकेआर) सामना 13

पर्पल कॅप म्हणजे काय, कोणाला दिली जाते?

पर्पल कॅप हा आयपीएलमध्ये (IPL) दिला जाणारा पुरस्कार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला ही कॅप दिली जाते. ही ऑरेंज कॅपसारखेच आहे, जी एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते.

मागच्या वेळी पर्पल कॅप कोणाला मिळाली होती?

आयपीएल 2022 मध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलने पर्पल कॅप मिळवली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने 27 बळी घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT