IPL 2023: रोमांचक सामन्यात KKR हरली, विजयासह लखनऊची Playoffs मध्ये धडक

IPL 2023 च्या 68 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा एका धावसंख्येने पराभव केला आहे.
Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsDainik Gomantak

IPL 2023 च्या 68 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा एका धावसंख्येने पराभव केला. या विजयासह लखनऊचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे.

यापूर्वी, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज पात्र ठरले आहेत. म्हणजेच आता प्लेऑफसाठी तीन संघ निश्चित झाले असून शेवटच्या स्थानासाठीची मुख्य स्पर्धा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आहे.

या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊने हा सामना नक्कीच जिंकला पण रिंकू सिंगने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली.

दरम्यान, निकोलस पूरनच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 176 धावा केल्या. लखनऊकडून निकोलस पूरनने 58 धावांची शानदार खेळी खेळली. तर कोलकाताकडून वैभव, सुनील आणि शार्दुल ठाकूर यांनी 2-2 बळी घेतले.

Lucknow Super Giants
IPL 2023: चेन्नई प्लेऑफचं डायरेक्ट तिकीट मिळवणार की दिल्लीचा शेवट गोड होणार? पाहा Playing XI

लखनऊने सामना जिंकला आणि रिंकूने मन जिंकले

दुसरीकडे, 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली. व्यंकटेश अय्यर आणि जेसन रॉय यांनी दमदार सुरुवात करुन दिली.

यानंतर मात्र, त्यांचा डाव फसला. मधल्या फळीतील विकेट्सही संघाने गमावल्या. शेवटी पुन्हा एकदा रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. त्याने 33 चेंडूत 6 चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 67 धावा केल्या.

केकेआरला शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती. अखेर संघाने एका धावसंख्येने सामना गमावला. पण रिंकूने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली.

Lucknow Super Giants
IPL 2023: लखनऊविरुद्ध 'करो वा मरो'च्या सामन्यात कोलकाताने जिंकला टॉस! असे आहेत दोन्ही टीमचे Playing XI

पूरन आणि आयुषची शानदार कामगिरी

तत्पूर्वी, निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी चांगली कामगिरी करुन लखनऊ सुपर जायंट्सला 8 बाद 176 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली.

दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी 47 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली. पूरनने 30 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली, ज्यात 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. तर आयुषने 21 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

सलामीवीर क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) (27 चेंडूत 28 धावा) आणि प्रेरक मंकड (20 चेंडूत 26 धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली.

केकेआरकडून वैभव अरोरा (4 षटकांत 30 धावा), सुनील नरेन (4 षटकांत 28 धावा) आणि शार्दुल ठाकूर (2 षटकांत 27 धावा) यांनी 2-2 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com