Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Mumbai Indians in IPL 2023: बुमराहच्या जागी 'हा' खेळाडू बनणार मुंबई इंडियन्सचे अस्त्र! अशी असू शकते Playing 11

IPL 2023 News: 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) च्या प्लेइंग इलेव्हनची आहे.

Manish Jadhav

IPL 2023 Mumbai Indians Bumrah Replacement: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) च्या संघाला 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

आयपीएल 2023 31 मार्चपासून सुरु होत आहे, परंतु सर्वाधिक चर्चा 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) च्या प्लेइंग इलेव्हनची आहे.

कारण जसप्रीत बुमराह मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. दुखापतीमुळे तो संघाचा भाग असणार नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या IPL सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) मैदानात उतरणार असलेल्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूया...

सलामीवीर

IPL 2023 मध्ये 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या IPL सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन मुंबई इंडियन्ससाठी सलामी देतील.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन ही जोडी खूपच धोकादायक असून हे दोन्ही फलंदाज पॉवर-प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. रोहित शर्मा आणि ईशान किशन हे सामन्याला क्षणार्धात वळण देण्यात माहिर आहेत.

मिडील ऑर्डर

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस, जो बेबी एबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखला जातो, तो मुंबई इंडियन्स (MI) च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 ऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्स (MI) च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरवू शकते.

अष्टपैलू

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीन मुंबई इंडियन्स (MI) च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकावर उतरेल. चेंडू आणि बॅटने सामना फिरवण्यात माहीर असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) 7व्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.

फिरकी गोलंदाजी डिपार्टमेंट

लेगस्पिनर पियुष चावला मुंबई इंडियन्स (MI) च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकी डिपार्टमेंटचे नेतृत्व करेल. पियुष चावलासह डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलाणीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.

वेगवान गोलंदाजी डिपार्टमेंट

मुंबई इंडियन्स (MI) च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाजांपैकी जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांना संधी दिली जाऊ शकते.

ही मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन असू शकते

रोहित शर्मा (क), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, शम्स मुलानी, जेसन बेहरेनडॉर्फ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT