IPL 2023: KKR ला मिळाला नवा कॅप्टन! श्रेयस अय्यरच्या जागेवर 'हा' अनुभवी खेळाडू करणार नेतृत्व

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2023 हंगामासाठी दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधाराची घोषणा केली आहे.
Kolkata Knight Riders
Kolkata Knight RidersDainik Gomantak
Published on
Updated on

Kolkata Knight Riders Captain: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वीच काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने काही संघांना धक्का बसला आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही समावेश आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे तो किमान आयपीएल 2023 चा पूर्वार्धाला तरी मुकण्याची शक्यता आहे.

या परिस्थितीत आता केकेआरने श्रेयसच्या अनुपस्थितीत संघाच्या प्रभारी कर्णधाराची घोषणा केली आहे. केकेआरने श्रेयसच्या अनुपस्थितीत नितीश राणाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे.

दरम्यान, श्रेयसच्या अनुपस्थितीत केकेआरचे नेतृत्व करण्यासाठी नितीश राणा व्यतिरिक्त सुनील नारायण देखील प्रबळ दावेदार होता. त्याने पहिल्या इंटरनॅशनल लीग टी२० स्पर्धेत अबुधाबी नाईट रायडर्सचे नेतृत्व केले होते. पण केकेआरने प्रभारी कर्णधार म्हणून आता नितीश राणाचे नाव पक्के केले आहे.

Kolkata Knight Riders
KKR च्या स्टार फलंदाजाला गोव्यात घ्यायचा होता 'हा' अनुभव, पत्नीला खोटं बोलून रात्री पडला बाहेर...

याबद्दल केकेआरने म्हटले आहे की 'आयपीएल 2023 मध्ये पाठीच्या दुखापतीतून सध्या सावरत असलेल्या श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्सते नेतृत्व करेल. आम्हाला आशा आहे की श्रेयल बरा होईल आणि आयपीएल 2023 साठी आगामी काळात कधीतरी संघासाठी उपलब्ध असेल.'

'आम्ही सुदैवी आहोत की नितीशकडे मर्यादीत षटकामध्ये त्याच्या राज्याच्या संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि त्याला 2018 पासून केकेआरकडून आयपीएल खेळण्याचाही अनुभव आहे, ज्याचा फायदा होईल.'

'आम्हाला विश्वास आहे की मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत आणि सपोर्ट स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आवश्यक असलेला सर्व पाठिंबा मैदानाबाहेर मिळेल. तसेच संघात असलेल्या अनुभवी खेळाडूंकडूनही त्याला मैदानात मिळेल. आम्ही त्याला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा देतो आणि आशा करतो की श्रेयस लवकर बरा होईल.'

Kolkata Knight Riders
KKR New Coach: चंद्रकांत पंडित असणार KKR चे नवे मुख्य प्रशिक्षक

नितीशने त्याचा राज्य संघ दिल्लीचे सईद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 12 टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. ज्यातील 8 सामने दिल्लीने जिंकली आहेत, तर 4 सामने पराभूत झाले आहेत.

नितीश 2018 पासून केकेआर संघात असून त्याने केकेआरसाठी 74 सामने खेळले असून 1744 धावा केल्या आहेत. तो गेल्यावर्षी केकेआरसाठी सर्वाधिक धावा करणारा श्रेयसनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याने 361 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com