KL Rahul and Kevin Pietersen Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पीटरसनकडून केएल राहुलचा अपमान? ऑन-एयर म्हणाला, 'त्याची फलंदाजी पाहाताना...'

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यादरम्यान केविन पीटरसनने केएल राहुलबद्दल विवादीत विधान केले

Pranali Kodre

Kevin Pietersen on KL Rahul: बुधवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना पार पडला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊने 10 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, हा सामना सुरु असताना इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने केएल राहुलबद्दल विवादीत विधान केले असल्याचा दावा अनेक सोशल मीडिया युजर्सने केला आहे.

पीटरसनने हा सामना सुरू असताना समालोचनादरम्यान केएल राहुलच्या धीम्यागतीने केलेल्या फलंदाजीबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

केविन पीटरसनने म्हटले आहे की 'केएल राहुलला पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना पाहाणे, हे माझ्यासाठी आत्तापर्यंतचे सर्वात बोरिंग काम आहे.' पीटरसनच्या या विधनावर सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी पीटरसनला याबाबत फटकारले देखील आहे.

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊकडून केएल राहुल आणि काईल मेयर्स यांनी सलामीला फलंदाजी केली होती. या दोघांनीही सुरुवातीला धीम्या गतीने खेळ केला होता. त्यांनी पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये 37 धावाच केल्या होत्या. यामध्ये केएल राहुलच्या 19 चेंडूत 19 धावांचा समावेश होता. तसेच केएल राहुलने या सामन्यातील ट्रेंट बोल्टने टाकलेल्या पहिल्या षटकात एकही धाव काढली नव्हती.

केएल राहुलने या सामन्यात 32 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 39 धावा केल्या, तसेच काईल मेयर्सने 42 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 51 धावांची खेळी केली. नंतर मार्कस स्टॉयनिस (21) आणि निकोलस पूरन (29) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे लखनऊने 20 षटकात 7 बाद 154 धावा केल्या.

दरम्यान, केएल राहुलने सामन्यानंतर ही खेळपट्टी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना पोषक असल्याचे सांगितले. तो म्हणाला, '10 षटकानंतर मला आणि काईलला मेसेज आला की या खेळपट्टीवर 160 धावसंख्या चांगली असेल. त्यांच्याकडेही चांगले गोलंदाज पण आहेत, ज्यांनी परिस्थितीचा फायदा घेतला आहे. आम्ही 10 धावा कमी केल्या, पण नंतर गोलंदाजीतून भरपाई केली.

'या खेळपट्टीवर दव नव्हते. त्यामुळे दोन्ही संघांसाठी खेळपट्टी पोषक होती. आम्हाला काल वाटले होते की या खेळपट्टीवर 180 च्या आसपार धावा होऊ शकतात. पण बोल्टच्या पहिल्या षटकानंतर मी आणि काईलने चर्चा केली आणि आम्हाला जाणवले की ही खेळपट्टी 180 धावांची नाही. चेंडू थोडा खाली राहात आहे. त्यामुळे आम्ही पॉवरप्लेमध्ये थोडा वेळ दिला. आम्ही अजून चांगले खेळलो असतो, तर 170 धावांपर्यंत पोहचू शकलो असतो.'

या सामन्यात लखनऊने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 6 बाद 144 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना लखनऊने जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT