MI vs SRH Dainik Gomatak
क्रीडा

IPL 2023: निर्णायक सामन्यात रोहित शर्माने जिंकला टॉस! असे आहेत मुंबई-हैदराबादची Playing XI

MI vs SRH: आयपीएल 2023 स्पर्धेचा रविवारी 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत रविवारी पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे. हा हंगामातील 69 वा सामना असून मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी मुंबईने हृतिक शोकिन ऐवजी कुमार कार्तिकेयला संघात संधी दिली आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघात मयंक अगरवालचे पुनरागमन झाले आहे. तसेच विवरांत शर्मालाही संधी देण्यात आली आहे. याशिवाय मयंक मार्कंडे, अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी हे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाले आहेत.

या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन आणि जेसन बेऱ्हेंडॉर्फ या परदेशी खेळाडूंना संधी देण्यात आली असून हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार एडेन मार्करमबरोबरच हेन्रिक क्लासेन, हॅरी ब्रुक आणि ग्लेन फिलिप्स या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

त्यामुळे दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी ४ परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांना भारतीय खेळाडूंनाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी हैदराबादने राखीव खेळाडूंमध्ये मयंक मार्कंडे, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, अकिल हुसेन आणि अब्दुल सामद यांना निवडले आहे, तर मुंबईने राखीव खेळाडूंमध्ये रमनदीप सिंग, विष्णू विनोद, ट्रिस्टन स्टब्स, तिलक वर्मा आणि संदीप वॉरियर यांची निवड केलेली आहे.

सनरायझर्स हैदराबादचा हा या हंगामातील अखेरचा सामना आहे. त्यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. पण मुंबई प्लेऑफच्या शर्यतीत असून त्यांना त्यांचे आव्हान मजबूत ठेवायचे असेल, तर या सामन्यात विजय गरजेचाच आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.

  • सनरायझर्स हैदराबाद - मयंक अगरवाल, विवरांत शर्मा, एडेन मार्कराम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: कुडचडे फसवणूक प्रकरणात बँक मॅनेजरला अटक

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

SCROLL FOR NEXT