CSK च्या कॉनवेने 'तो' सिक्स अन् IPL इतिहासात 'हा' कारनामा दुसऱ्यांदाच घडला

आयपीएल 2023 मध्ये डेव्हॉन कॉनवेने दुसऱ्याच ओव्हरमध्ये मारलेला षटकार विक्रमी ठरला आहे.
Devon Conway
Devon ConwayDainik Gomantak

Most sixes in IPL Season: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यादरम्यान षटकारांबाबत मोठा विक्रम घडला आहे.

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी सलामीला फलंदाजी केली. त्यांनी चेन्नईला दमदार सुरूवात करून देताना शतकी भागीदारीही केली. या दोघांनीही वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली आहेत.

Devon Conway
Ben Stokes सोडणार CSK ची साथ? कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीमची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाले स्थान

दरम्यान, या सामन्याच्या दुसऱ्या षटकात ललित यादवच्या गोलंदाजीवर डेव्हॉन कॉनवेने खणखणीत षटकार मारला. त्याचा हा षटकार आयपीएल २०२३ स्पर्धेतील १००० वा षटकार ठरला आहे.

महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदाच असे झाले आहे की एकाच हंगामात १००० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्यात आले आहेत. यापूर्वी आयपीएल २०२२ हंगामात १००० पेक्षा अधिक षटकार मारण्यात आले होते. आयपीएल २०२२ हंगामात १०६२ षटकार ठोकण्यात आले होते.

आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकात

  • १०६२ - आयपीएल २०२२

  • १००० - आयपीएल २०२३

  • ८७२ - आयपीएल २०१८

  • ७८४ - आयपीएल २०१९

  • ७३४ - आयपीएल २०२०

  • ७३१ - आयपीएल २०१२

  • ७१४ - आयपीएल २०१४

  • ७०५ - आयपीएल २०१७

  • ६९२ - आयपीएल २०१५

  • ६८७ - आयपीएल २०२१

  • ६७२ - आयपीएल २०१३

  • ६३९ - आयपीएल २०११

  • ६३८ - आयपीएल २०१६

  • ६२२ - आयपीएल २००८

  • ५८५ - आयपीएल २००९

Devon Conway
IPL 2023 च्या धामधुमीत BCCI ची WTC Final साठी योजना तयार! तीन तुकड्यात टीम इंडिया निघणार दौऱ्यावर

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), रिली रोसौ, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, एन्रिच नॉर्किया

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक / कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com