Cameron Green and Rohit Sharma
Cameron Green and Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: ग्रीनचं शतक अन् मुंबईने ठोकली Playoff ची दावेदारी! हैदराबादचा शेवटच्या मॅचमध्ये दारुण पराभव

Pranali Kodre

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 8 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयासह मुंबईने प्लेऑफसाठी प्रबळ दावेदारी ठोकली आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणाऱ्या आयपीएल 2023 मधील 70 व्या सामन्यात बेंगोलर पराभूत झाले किंवा हा सामना रद्द झाल्यास मुंबई गुणतालिकेतील चौथे स्थान पक्के करण्याबरोबरच प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

मात्र, सनरायझर्स हैदराबादचा हा या हंगामातील अखेरचा सामना होता. त्यांचे आव्हान यापूर्वीच संपले होते.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईसमोर 201 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 18 षटकात 2 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. मुंबईकडून कॅमेरॉन ग्रीनने शानदार खेळ करताना नाबाद शतकी खेळी केली.

मुंबईकडून सलामीला ईशान किशन आणि रोहित शर्मा उतरले होते. पण ईशानची विकेट लवकर गेली. त्याला भुवनेश्वर कुमारने तिसऱ्याच षटकात 14 धावांवर बाद केले. त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरॉन ग्रीनने शानदार खेळ केला.

त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याला रोहितनेही चांगली साथ दिली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण करताना तब्बल 128 धावांची भागीदारीही केली. पण रोहित अर्धशतकानंतर मयंक डागरच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहितने 37 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची खेळी केली.

त्यानंतर सूर्यकुमारने ग्रीनला चांगली साथ दिली. ग्रीननेही चांगला खेळ करत त्याचे शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाबरोबरच मुंबईने विजयावरही शिक्कामोर्तब केला. ग्रीनने 47 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 8 षटकार मारले.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून विवरांत शर्मा आणि मयंक अगरवाल यांनी सलामीला फलंदाजी केली. या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व ठेवताना पहिल्या 13 षटकांमध्ये मोठे यश मिळू दिले नाही. या दोघांनीही आक्रमक फलंदाजी केली.

त्यामुळे 13 षटकांमध्ये त्यांनी जवळपास 130 धावांचाही टप्पा संघाला पार करून दिला होता. या दोघांनीही या भागीदारीदरम्यान वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली होती. अखेर त्यांची 140 धावांची भागीदारी 14 व्या षटकात आकाश मधवालने तोडली.

त्याने विवरांत शर्माला बाद केले. विवरांतने 47 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर हेन्रिक क्लासेनने अगरवाची चांगली साथ दिली होती. पण 17 व्या षटकात मधवालनेच अगरवाललाही बाद केले. अगरवालने 46 चेंडूत 83 धावांची खेळी केली, या खेळीत त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले.

त्याच्या पुढच्याच षटकात ग्लेन फिलिप्सही 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर 19 व्या षटकात मधवालने हैदराबादला दोन धक्के दिले. त्याने क्लासेनला 18 आणि हॅरी ब्रुकला शुन्यावर लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. पण अखेरच्या षटकात कर्णधार एडेन मार्करम आणि सनवीर सिंग यांनी आक्रमक खेळ करत हैदराबादला 20 षटकात 5 बाद 200 धावांचा टप्पा गाठून दिला.

मुंबईकडून आकाश मधवालने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 37 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस जॉर्डनने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT