Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

MI vs RCB IPL 2023: वानखेडेवर सुर्याचा जलवा! बेंगलोरवर एकतर्फी विजयासह मुंबईची पॉइंट्स टेबलमध्येही मोठी झेप

आयपीएल 2023 स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore, IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात 54 वा सामना झाला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा मुंबईचा 11 सामन्यांतील 6 वा विजय ठरला. त्यामुळे आता गुणतालिकेत मुंबईने तिसरे स्थान गाठले आहे.

या सामन्यात बेंगलोरने मुंबईसमोर 200 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतकी खेळी केली. मुंबईने या हंगामात तिसऱ्यांदा 200 धावांचे आव्हान यशस्वी पार केले आहे, हा देखील एक विक्रम आहे.

या सामन्यात मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी डावाची सुरवात केली. एका बाजूने ईशान किशनने बेंगलोरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला होता, तर दुसरी बाजू रोहितने सांभाळली होती. पण या दोघांनाही पाचव्या षटकात वनिंदू हसरंगाने बाद केले. ईशानने 21 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 42 धावा केल्या. तसेच रोहित 7 धावाच करू शकला.

पण यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांची जोडी जमली.या दोघांनीही आक्रमक खेळ सुरू केला. त्यांनी जवळपास बेंगलोरच्या सर्व गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळ केला. दरम्यान, सूर्यकुमारने 26 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. त्या दोघांनी पाहाता पाहाता शतकी भागीदारीही केली. त्यामुळे मुंबईने 190 धावांचा आकडा सहज पूर्ण केला.

पण मुंबईला विजयासाठी 8 धावांची गरज असताना सूर्यकुमारला विजयकुमार वैशाखने बाद केले. सूर्यकुमारने 35 चेंडूत 83 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर टिम डेव्हिडही बाद झाला.

अखेरीस नेहलने विजयी फटका मारताना त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्यामुळे मुंबईने 16 व्या षटकातच विजय मिळवला. नेहलने 34 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच ग्रीन 2 धावांवर नाबाद राहिला.

बेंगलोरकडून वनिंदू हसरंगा आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून सलामीला विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस फलंदाजीला उतरले होते. पण विराटची विकेट पहिल्याच षटकात जेसन बेऱ्हेंडॉर्फने घेतली. विराट केवळ 1 धाव करू शकला. त्यापाठोपाठ तिसऱ्या षटकात बेऱ्हेंडॉर्फने अनुज रावतलाही 6 धावांवर माघारी धाडले. पण यानंतर मात्र फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांची जोडी जमली.

या दोघांनीही मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना तुफानी खेळ सुरू केला. दोघेही आक्रमक खेळत असाताना त्यांनी 10 षटकातच जवळपास 100 धावा संघासाठी उभ्या केल्या. या दोघांमध्ये शतकी भागीदारीही झाली. यादरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली.

पण अखेर त्यांची जोडी तोडण्यात बेऱ्हेंडॉर्फलाच यश मिळाले. त्याने मॅक्सवेलला बाद करत त्यांची 120 धावांची भागीदारीही तोडली. मॅक्सवेलने 33 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. मॅक्सवेल पाठोपाठ महिपाल लोमरोरलाही कुमार कार्तिकेयने 1 धावेवरच माघारी पाठवले.

लगेचच 15 व्या षटकात डू प्लेसिसही माघारी परतला. त्याला ग्रीनने बाद केले. डू प्लेसिसने 41 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. पण नंतर दिनेश कार्तिकनेही आक्रमक फलंदाजी केली. पण त्यालाही 19 व्या षटकात ख्रिस जॉर्डनने बाद केले. कार्तिकने 18 चेंडूत 30 धावा केल्या. अखेरीस केदार जाधव आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी नाबाद 12 धावा केल्या. त्यामुळे बेंगलोरला 20 षटकात 6 बाद 199 धावा करता आल्या.

मुंबईकडून जेसन बेऱ्हेंडॉर्फने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कॅमेरॉन ग्रीन, ख्रिस जॉर्डन आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT