Mumbai Indians vs Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: गुजरातने जिंकला टॉस! वानखेडेवर मुंबईविरुद्ध लढण्यास हार्दिकब्रिगेड सज्ज; पाहा Playing XI

MI vs GT: आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होणार आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी (12 मे) 57 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे या सामन्यातही मुंबईकडून तिलक वर्मा खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सामन्यसाठी मुंबईने कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन आणि जेसन बेऱ्हेंडॉर्फ या चार परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तसेच गुजरातने डेव्हिड मिलर, राशीद खान, अल्झारी जोसेफ आणि नूर अहमद या चार परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच खेळवता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये मुंबईने रमनदीप सिंग, आकाश मधवाल, डेवाल्ड ब्रेविस, संदीप वॉरियर आणि हृतिक शोकिन यांना निवडले आहे. तसेच गुजरातने राखीव खेळाडूंमध्ये केएस भरत, शिवम मावी, साई किशोर, साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांची निवड केली आहे.

हा सामना प्लेऑफच्या दृष्टीनेही महत्त्वाचा समजला जात आहे. या सामन्यात गुजरातने विजय मिळवल्यास गुजरात प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के करतील, मात्र मुंबईसाठी प्लेऑफची शर्यत कठीण होईल.

पण जर मुंबईने विजय मिळवला, तर त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच गुजरातला पराभव स्विकारला तरी गुणतालिकेतील त्यांच्या पहिल्या क्रमांकाला धक्का बसणार नाहीये, तरी आयपीएलचा अंतिम टप्पा असल्याने ते विजयी लय कायम ठेवून प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्याचा प्रयत्न करताना दिसतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • मुंबई इंडियन्स - ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, कुमार कार्तिकेय.

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: उसगाव-फोंडा मार्गावर चिरेवाहू ट्रक उलटला! चालक जखमी; काही वेळ वाहतूक कोंडी

Goa Road Closure: दाबोळी-वेर्णा वाहतूक वळविली, 29 पासून कार्यवाही; कुठ्ठाळी-चिखली महामार्गावरून अवजड वाहतूक

Horoscope: तुमचे प्रेम संबंध होणार मजबूत! 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस आहे 'रोमान्स'ने भरलेला

Jetty Project Goa: जेटीचे काम थांबवा, अन्यथा पणजीत मोर्चा; ग्रामस्थांचा इशारा; असोल्डा, शेळवण, होडर येथील प्रकल्पाला विरोध

Goa Employee Marital Data: 12,907 कर्मचारी 'शुभमंगल' विना; नियोजन, सांख्‍यिकी मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातून समोर

SCROLL FOR NEXT