Mumbai Indians: RCB विरुद्धचा विजय ऐतिहासिकच! IPL मध्ये कोणालाच जे जमले नाही, ते मुंबईने करून दाखवले

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 200 धावांचा यशस्वी पाठलाग करत मोठा विक्रम केला आहे.
Nehal Wadhera - Suryakumar Yadav
Nehal Wadhera - Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Indians Record: मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात वानखेडे स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने तब्बल 21 चेंडू राखून 6 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा विजय विक्रमी ठरला आहे.

या सामन्यात बेंगलोरने मुंबईसमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. महत्त्वाचे म्हणजे चालू आयपीएल हंगामात 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पूर्ण करण्याची ही मुंबई इंडियन्सची तिसरी वेळ होती.

Nehal Wadhera - Suryakumar Yadav
Rohit Sharma आऊट की नॉटआऊट? मुंबईच्या कॅप्टनचा DRS वादाच्या भोवऱ्यात, माजी खेळाडूही नाराज

त्यामुळे एकाच आयपीएल हंगामात तीन वेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वी पार करणारा मुंबई इंडियन्स पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने 2014 साली आणि चेन्नई सुपर किंग्सने 2018 साली दोन वेळा असा कारनामा केला होता.

त्याचबरोबर 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतानाही आता सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याच्या बाबतीतही मुंबई इंडियन्स अव्वल क्रमांकावर आले आहेत. यापूर्वी हा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर होता. त्यांनी 2017 साली गुजरात लायन्सविरुद्ध 208 धावांचे आव्हान 15 चेंडू राखून पूर्ण केले होते. तसेच पंजाब किंग्सने 2010 साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 201 धावांचे आव्हान 10 चेंडू राखून पूर्ण केले होते.

Nehal Wadhera - Suryakumar Yadav
Jofra Archer Out of IPL 2023: मुंबईला धक्का! आर्चरची 'या' कारणामुळे IPL 2023 मधून माघार, बदली खेळाडूचीही घोषणा

मुंबईसाठी विजय महत्त्वाचा

मुंबईसाठी प्लेऑफच्या दृष्टीनेही हा विजय महत्त्वाचा ठरला आहे. या विजयानंतर आता मुंबईने गुणतालिकेत 12 गुणांसह तिसरे स्थान गाठले आहे. मुंबईने आत्तापर्यंत या हंगामात 11 सामने खेळले असून 6 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत आणि 5 सामने पराभूत झाले आहेत.

मंगळवारी झालेल्या सामन्यात 200 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना मुंबईसाठी सूर्यकुमारने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने 35 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 6 षटकार मारले. तसेच त्याने नेहल वढेराबरोबर 140 धावांची भागीदारीही केली.

नेहलनेही नाबाद अर्धशतक करताना 34 चेंडूत 52 धावा ठोकल्या. तसेच त्यापूर्वी ईशान किशनने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com