KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: लखनऊचा कॅप्टन केएल राहुललाही झाला लाखोंचा दंड, जाणून घ्या कारण

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना जिंकल्यानंतर दंडाच्या कारवाईलाही समोरे जावे लागले आहे.

Pranali Kodre

KL Rahul has been Fined 12 Lakh: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 26 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सवाई मानसिंग स्टेडिमवर झाला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने 10 धावांनी विजय मिळवला. पण असे असले तरी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

आयपीएलने केएल राहुलवर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल प्रसिद्धीपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. त्याच दिलेल्या माहितीनुसार या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून निर्धारित वेळेत पूर्ण षटके टाकण्यात आली नाहीत. त्यामुळे षटकांची गती कमी राखल्याबद्दल केएल राहुलला दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांची गती कमी राखल्याच्या आरोपासाठी लखनऊचा कर्णधार केएल राहुलवर 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. ही संघाची पहिली चूक होती.

दरम्यान, षटकांची गती कमी राखल्याबद्दल 12 लाखांचा दंड होणारा केएल राहुल पहिला कर्णधार नाही. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांना देखील आयपीएल 2023 हंगामात षटकांची गती कमी राखल्यामुळे 12 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

लखनऊने जिंकला सामना

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात लखनऊकडून काईल मेयर्सने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार केएल राहुलने 39 धावा केल्या. याशिवाय मार्कस स्टॉयनिसने 21 आणि निकोलस पूरनने 29 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे लखनऊने 20 षटकात 7 बाद 154 धावा केल्या होत्या.

त्यानंतर 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 44 आणि जॉस बटलरने 40 धावांची खेळी केली. मात्र अन्य कोणीही फार काही करू शकले नाहीत. त्यामुळे राजस्थानला 20 षटकात 6 बाद 144 धावाच करता आल्या.

या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांकडूनही चांगली कामगिरी झाली. राजस्थानकडून आर अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्याचबरोबर लखनऊकडून आवेश खानने 3 विकेट्स घेतल्या आणि मार्कस स्टॉयनिसने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT