यंदाचं IPL जरा हटके! 26 सामन्यांतून मिळाले वेगवेगळे 26 मॅचविनर खेळाडू, लिस्ट एकदा पाहाच

आयपीएल 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत झालेल्या 26 सामन्यांमध्ये 26 वेगवेगळ्या खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
IPL Captains
IPL CaptainsDainik Gomantak
Published on
Updated on

26 Different match-winners from first 26: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारपर्यंत (19 एप्रिल) 26 सामने खेळून झाले आहेत. 10 संघांपैकी दोन संघ आत्तापर्यंत प्रत्येकी 6 सामने खेळले आहेत, तर 8 संघ प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. दरम्यान, यंदा जवळपास सर्वच संघ संमिश्र कामगिरी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सर्व संघांनी किमान दोन सामने तरी आत्तापर्यंत पराभूत झालेले आहेत.

26 मॅचविनर खेळाडू

यंदाच्या आयपीएलमध्ये एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली आहे. 26 सामन्यांमध्ये 26 वेगवेगळे मॅचविनर खेळाडू पाहायला मिळाले आहे. म्हणजेच आत्तापर्यंत झालेल्या 26 सामन्यांमध्ये 26 वेगवेगळ्या खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. आत्तापर्यंत एकाही खेळाडूने या हंगामात दोनवेळी सामनावीर पुरस्कार जिंकलेला नाही.

IPL Captains
IPL 2023: विराट पुन्हा RCB चा कर्णधार, 'या' कारणामुळे घेण्यात आला मोठा निर्णय

आयपीएल 2023 मध्ये आत्तापर्यंत सामनावीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू (26 सामने)

  • चेन्नई सुपर किंग्स - रविंद्र जडेजा, मोईन अली आणि डेवॉन कॉनवे

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा आणि कॅमेरॉन ग्रीन

  • राजस्थान रॉयल्स - जॉस बटलर, शिमरॉन हेटमायर, रविंचंद्रन अश्विन आणि यशस्वी जयस्वाल

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली

  • कोलकाता नाईट रायडर्स - रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर आणि वेंकटेश अय्यर

  • गुजरात टायटन्स - राशिद खान, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन

  • लखनऊ सुपर जायंट्स - मार्क वूड, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पंड्या

  • पंजाब किंग्स - अर्शदीप सिंग, शिखर धवन, सिकंदर रझा आणि नॅथन एलिस

  • सनरायझर्स हैदराबाद - हॅरि ब्रुक

IPL Captains
दुष्काळात तेरावा! दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज IPL 2023 मधून 'या' कारणामुळे बाहेर

अशी आहे गुणतालिका

सध्या दोन संघांचे 8 गुण, चार संघांचे 6 गुण, तीन संघांचे 4 गुण आणि दिल्ली कॅपिटल्स या एकमेव संघाचे शुन्य गुण आहेत. संघाचे सारखे गुण असले तरी नेट रनरेटनुसार त्यांचे गुणतालिकेतील स्थान अवलंबुन आहे.

राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ सध्या प्रत्येकी 8 गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्रत्येकी 6 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

त्याचबरोबर 4 गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद हे तीन संघ अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स शुन्य गुणांसह अखेरच्या क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com