Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, Eliminator: लखनऊचा सलग दुसऱ्यांदा स्वप्नभंग! मुंबईचा दणदणीत विजयासह 'क्वालिफायर-2' मध्ये प्रवेश

मधवालच्या 5 विकेट्सच्या जोरावर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत करत क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे.

Pranali Kodre

IPL 2023 Lucknow Super Giants vs Mumbai Indians, Eliminator: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात एलिमिनेटरचा सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सन 81 धावांनी विजय मिळवत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवालने 5 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली.

आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सवरविरुद्ध होणार आहे. दरम्यान, लखनऊचे मात्र एलिमिनेटरमध्ये पराभव स्विकरल्याने आव्हान संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे मागील हंगामातही लखनऊने एलिमिनेटर सामन्यातच पराभव स्विकारला होता.

बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 183 धावांचे आव्हान लखनऊसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 16.3 षटकात सर्वबाद 101 धावाच करता आल्या.

या सामन्यात मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून काईल मेयर्स आणि प्रेरक मंकड यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, दुसऱ्याच षटकात आकाश मधवालने प्रेरकला 3 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मेयर्सलाही ख्रिस जॉर्डनने ख्रिस ग्रीनच्या हातून 18 धावांवर झेलबाद केले.

पण त्यानंतर कर्णधार कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र धावा करण्याच संघर्ष करणारा कृणाल अखेर 9 व्या षटकात 8 धावांवर बाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात मधवालने लखनऊला सलग दोन चेंडूत दोन मोठे धक्के दिले. त्याने आयुष बडोनीला 1 धावेवर आणि निकोलस पूरनला शून्यावर बाद केले.

पण तरी स्टॉयनिस आणि दीपक हुडा यांच्या जोडीवर लखनऊच्या आशा होत्या. पण १२ व्या षटकात दुहेरी धाव घेताना झालेल्या गोंधळामुळे स्टॉयनिस 27 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. यानंतर मात्र लखनऊचा संघ फार काही करू शकला नाही. त्यानंतर कृष्णप्पा गॉथम २ धावांवर आणि दीपक हुडाही 15 धावांवर धावबाद झाले. मधवालने रवी बिश्नोई आणि मोहसीन खान यांनाही बाद करत लखनऊचा डाव संपवला.

मुंबईकडून आकाश मधवालने 3.3 षटके गोलंदाजी करताना केवळ 5 धावांत 5 विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस जॉर्डन आणि पीयुष चावलाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित 11 धावांवर नवीन-उल-हकच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर ईशानही 15 धावांवर बाद झाला.

पण नंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी 66 धावांची भागीदारी केली. त्यामुळे 100 धावांचा टप्पा मुंबईने जवळपास 10 षटकातच सहज पार केला होता. पण 11 व्या षटकात नवीनने मुंबईला दोन मोठे धक्के दिले. त्याने सूर्यकुमारला 33 धावांवर आणि ग्रीनला 41 धावांवर बाद केले.

यानंतर मुंबईच्या धावांना लगाम लागला होता. तरी डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनीही झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण डेव्हिड 13 धावांवर आणि तिलक 26 धावा करून बाद झाला. अखेरीस इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलेल्या नेहल वढेराने आक्रमक खेळ केला. त्याने 12 चेंडूच 2 चौकार आणि 2 षटकारांसह 23 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 8 बाद 182 धावा उभारता आल्या.

लखनऊकडून नवीन उल हकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच यश ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या, तर मोहसिन खानने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT