Akash Madhwal Dainik Gomantak
क्रीडा

Akash Madhwal 5 Wickets: मुंबईचा हुकमी एक्का! 5 धावांत 5 विकेट्स घेणारा कोण आहे आकाश मधवाल?

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून एलिमिनेटरमध्ये 5 धावांत 5 विकेट्स घेणाऱ्या आकाश मधवालबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Who is Akash Madhwal?: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने बुधवारी एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी पराभूत केले. यासह मुंबईने आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला आहे. मुंबईच्या या विजयात आकाश मधवालने 5 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.

मुंबईकडून मधवालने 3.3 षटके गोलंदाजी करताना केवळ 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 16.3 षटकात सर्वबाद 101 धावाच करता आल्या.

त्याने प्रेरक मंडक, आयुष बदोनी, निकोलस पूरन, रवी बिश्नोई आणि मोहसीन खान यांनी विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. पण खरंतर चार वर्षांपूर्वी मधवाल क्रिकेटबाबत इतका गंभीर नव्हता, असे म्हणता येऊ शकते. कारण त्याने क्रिकेटचा लाल चेंडू हातीही घेतला नव्हता. तो त्यावेळी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा.

मधवालने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो आयपीएलमध्ये खेळणारा उत्तराखंडचा पहिला खेळाडू आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सध्याचे उत्तराखंडचे प्रशिक्षक मनिष झा यांनी सांगितले की 2019 मध्ये एका ट्रायल्समध्ये तो आला होता.

त्यावेळी त्याने उत्तराखंडचे तात्कालिन प्रशिक्षक वासिम जाफरला प्रभावित केले होते. त्याने त्याला लगेचच सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळवले होते. त्यानंतर जाफरने प्रशिक्षकपद सोडल्यानंतर झा यांनी ती जबाबदारी सांभाळली. त्यावेळी त्यांनी त्याला तिन्ही क्रिकेट प्रकारात त्याला खेळवणार असल्याचे सांगितले.

मधवालनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे 2023 देशांतर्गत हंगामापूर्वी त्याला मर्यादीत षटकांच्या स्पर्धांसाठी उत्तराखंडचा कर्णधारही करण्यात आले आहे. त्याला 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादव ऐवजी संघात घेतले होते.

पंतचा शेजारी

विशेष गोष्ट अशी की उत्तराखंडमध्ये भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत जिथे राहातो, तिथेच मधवालही राहतो. तसेच मधवालनेही अवतार सिंग यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. पंतने दिल्लीला येण्याआधी त्यांच्याकडूनच प्रशिक्षण घेतले होते.

मधवालची कारकिर्द

29 वर्षीय मधवालने आत्तापर्यंत 10 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 17 सामने खेळले असून 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 29 सामने खेळले असून 37 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT