KKR vs GT Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: सलग दोन फिफ्टी ठोकणारा जेसन रॉय बाहेर! असे आहेत कोलकाता-गुजरातचे Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेत 39 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे.

Pranali Kodre

Kolkata Knight Riders vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (29 एप्रिल) दोन सामने खेळवले जात आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डन्सला होत आहे.

या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल.

हा सामना राशीद खानचा आयपीएलमधील 100 वा सामना आहे, तर आंद्र रसेल हा त्याच्या वाढदिवशी खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी गुजरातने त्यांच्या संघात बदल केलेला नाही. पण कोलकाताने काही बदल केले आहेत. कोलकाताकडून सलग दोन अर्धशतक करणाऱ्या जेसन रॉय ऐवजी रेहमनुल्लाह गुरबाजला आणि उमेश यादव ऐवजी हर्षित राणा यांना संधी देण्यात आली आहे. रॉय चांगल्या फॉर्ममध्ये असला, तरी तो पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

या सामन्यासाठी कोलकाताने रेहमनुल्लाह गुरबाज, आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि डेव्हिड विसे या चार परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तसेच गुजरात टायटन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हिड मिलर, राशीद खान, नूर अहमद आणि जोशुआ लिटील या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघात प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये गुजरातने शुबमन गिल, श्रीकर भारत, आर साई किशोर, शिवम मावी आणि जयंत यादव यांची निवड केली आहे, तर कोलकाताने सुयश शर्मा, मनदीप सिंग, अनुकूल रॉय, टीम साऊथी आणि कुलवंत खेजरोलिया यांची निवड केली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधा), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.

  • कोलकाता नाईट रायडर्स - एन जगदीसन, रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हे काय बोलून गेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री', भाजपमध्ये लवकरच भूकंप? सोशल मिडियावर रंगली चर्चा तर विरोधक म्हणाले, 'कामत खरं तेच बोलले

Nepal Protest Explained: जाळपोळ, दगडफेक करत नेपाळमध्ये लाखो तरूण रस्त्यावर का उतरलेत? सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचार आणि तेथील राजकारण समजून घ्या

Viral Video: मुर्खपणाचा कळस! रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपला, भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, पठ्ठ्याचा व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Goa Live Updates: मुरगाव पालिकेत भरतीवरुन गदारोळ; NSUI आणि सावियो कुतिन्हो यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव

हरमल किनाऱ्यावर आढळला परदेशी महिलेचा मृतदेह, बुडून मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस तपास सुरु

SCROLL FOR NEXT