IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सने रचला इतिहास, 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लीगमध्ये घडला 'हा' पराक्रम!

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 38 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने धोकादायक फलंदाजी करत पंजाब किंग्जच्या गोलंदाजांची धुलाई केली.
Lucknow Super Giants
Lucknow Super Giants Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 38 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने धोकादायक फलंदाजी करत पंजाब किंग्जच्या गोलंदाजांची धुलाई केली.

नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनऊला काइल मेयर्सने शानदार सुरुवात करुन दिली. संघाची धावसंख्या 8 षटकांत 100 च्या पुढे होती.

संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 257 धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने 40 चेंडूत 77 धावांची तूफानी खेळी खेळली.

त्याच्याशिवाय, काईल मायर्सनेही 24 चेंडूत 54 धावा काढल्या. याशिवाय, आयुष बडोनीने 24 चेंडूत 43 आणि निकोलस पूरनने 19 चेंडूत 45 धावा केल्या.

आयपीएलच्या (IPL) इतिहासात दुसऱ्यांदा 250 धावांचा टप्पा ओलांडला. 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे घडले आहे.

दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील एका डावात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आरसीबीने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध केला होता.

याआधी, 2016 मध्ये आरसीबीच्या (RCB) नावावर लीगमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या 248 होती. आता सात वर्षांनंतर लखनऊ सुपर जायंट्सने तो मोडला आहे.

आयपीएलच्या 16 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा असे घडले आहे की, एका डावात 250 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत.

यासह लखनऊने या मोसमातील सर्वात मोठी धावसंख्याही केली आहे. यापूर्वी या मोसमात सीएसकेच्या नावावर 235 धावांची नोंद झाली होती.

Lucknow Super Giants
IPL 2023: कॅप्टन धवनचे कमबॅक, रबाडाही खेळणार! पाहा पंजाब-लखनऊ संघांची Playing XI

IPL इतिहासातील 5 मोठे स्कोर (एका डावात).

RCB - 263/5 (वि पुणे वॉरियर्स, 2013)

लखनौ सुपर जायंट्स - 257/5 (वि. पंजाब किंग्ज, 2023)

RCB – 248/3 (विरुद्ध गुजरात लायन्स, 2016)

CSK - 246/5 ​​(वि. राजस्थान रॉयल्स, 2010)

KKR - 245/6 (वि. पंजाब किंग्ज, 2018)

Lucknow Super Giants
IPL 2023: CSK च्या 'या' धाकडने राजस्थानविरुद्ध केला मोठा पराक्रम, नावावर झाला शानदार रेकॉर्ड!

तसेच, लखनऊ सुपर जायंट्सच्या या डावात केएल राहुल वगळता सर्वांनीच अप्रतिम फलंदाजी केली. दीपक हुड्डाही 6 चेंडूत 11 धावा आणि कृणाल पांड्याने 2 चेंडूत 5 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

या सामन्यातील सर्वात मोठ्या धावसंख्येशिवाय सर्वाधिक चौकारांचा विक्रमही लखनऊने आपल्या नावावर केला. या सामन्यात लखनऊने 27 चौकार आणि 14 षटकारांसह 41 चौकार ठोकले.

Lucknow Super Giants
IPL 2023: फलंदाजांच्या वादळानंतर, गोलंदाजांची कमाल! कोलकाताने रोखला बेंगलोरचा विजय रथ

आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक चौकारांचा विक्रम

42 (21, 21) - आरसीबी विरुद्ध पुणे वॉरियर्स, 2013

41 (27, 14) - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 2023

39 (24, 15) - केकेआर विरुद्ध पंजाब किंग्ज, 2018

38 (30, 8) - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2021

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com