CSK  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चेन्नईकडून कोलकाताचा घरच्या मैदानात पराभव! CSK पाँइंट टेबलमध्येही 'टॉप'

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला ईडन गार्डन्सवर पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी दोन सामने झाले. दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 49 धावांनी विजय मिळवला. अजिंक्य रहाणेची कामगिरी चेन्नईसाठी या सामन्यात महत्त्वाची ठरली.

हा चेन्नईचा या हंगामातील 7 सामन्यांमधील पाचवा विजय ठरला आहे. त्यामुळे चेन्नईचे आता 10 गुण झाले असून सध्या 33 सामन्यांनंतर चेन्नई गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आले आहेत. तसेच कोलकाताचा मात्र हा 7 सामन्यांमधील पाचवा पराभव आहे.

या सामन्यात चेन्नईने कोलकातासमोर विजयासाठी 236 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला 20 षटकात 8 बाद 186 धावा करता आल्या.

कोलकाताकडून सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांचे सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या सुनील नारायण आणि एन जगदीशन यांनी झटपट विकेट्स गमावल्या. नारायण तर भोपळाही फोडू शकला नाही. पण त्यानंतर कर्णधार नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी डाव सांभाळताना 45 धावांची भागीदारी केली.

पण त्यांची रंगत असलेली भागीदारी मोईन अलीने वेंकटेश अय्यरला 20 धावांवर बाद करत तोडली. त्यानंतर नितीशला जेसन रॉयने साथ दिली. पण काही वेळात नितीशच रविंद्र जडेजाविरुद्ध खेळताना 27 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर जेसन रॉयने रिंकू सिंगला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे कोलकाताने सहज 100 धावांचा टप्पा पार केला.

या दरम्यान,जेसन रॉयने अर्धशतकही पूर्ण केले. पण त्यानंतर रॉय 26 चेंडूत 61 धावांची आक्रमक खेळी करून बाद झाला. त्याला महिश तिक्षणाने त्रिफळाचीत केले. रॉयने त्याच्या अर्धशतकी खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार मारले.

यानंतर फलंदाजीला आलेले आंद्रे रसेल (9), डेव्हिड विसे (1), उमेश यादव (4) हे देखील काही खास करू शकले नाही. मात्र, एक बाजू रिंकू सिंगने चांगली सांभाळलेली होती. त्याने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो कोलकाताला विजयापर्यंत पोहचवू शकला नाही. रिंकू 33 चेंडूत 53 धावा करून नाबाद राहिला.

चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच आकाश सिंग, मोईन अली, रविंद्र जडेजा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, या सामन्यात कोलकाताने नाणेफेकर जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. चेन्नईकडून डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सुरुवात देताना सलामीला 73 धावांची भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी सुयश शर्माने ऋतुराजला 20 चेंडूत 35 धावांवर असताना त्रिफळाचीत केले.

त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कॉनवे यांनी डाव पुढे नेला. दरम्यान कॉनवेने त्याची लय चांगली ठेवताना अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर तो वरुण चक्रवर्तीविरुद्ध खेळताना बाद झाला. त्याने 40 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावांची खेळी केली.

यानंतर मात्र, रहाणेने जबाबदारी खांद्यावर घेत तुफानी फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. त्याला शिवम दुबेची शानदार साथ मिळाली. दुबेनेही फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 32 चेंडूत 85 धावांची भागीदारी केली. पण दुबेला कुलवंत खजरोलियाने बाद केले. दुबेने 2 चौकार आणि 5 षटकारांसह 21 चेंडूत 50 धावांची खेळी केली.

मात्र, दुसऱ्या बाजूने रहाणेने त्याचा खेळ सुरू ठेवला होता. रविंद्र जडेजानेही 8 चेंडूत 18 धावांची छोटेखानी खेळी केली. अखेरच्या षटकात जडेजा बाद झाल्याने एमएस धोनी फलंदाजीला आला. धोनीने 3 चेंडूत नाबाद 2 धावा केल्या. तसेच अजिंक्य रहाणे 29 चेंडूत 71 धावा करून नाबाद राहिला. त्याने तडाखेबंद खेळी करताना 6 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यामुळे चेन्नईला 20 षटकात 4 बाद 235 धावा करता आल्या.

कोलकाताकडून कुलवंत खेजरोलियाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: थिवी रेल्वे स्थानकात 3 लाखांचा गांजा जप्त

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT