अर्शदीपकडून IPL चे लाखोंचे नुकसान! सलग दोन बोल्ड करत तोडलेल्या स्टंपची नक्की किंमत किती?

मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्शदीपने अखेरच्या षटकात दोन बोल्ड करत मिडल स्टंप तोडले, पण यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
Arshdeep Singh
Arshdeep SinghDainik Gomantak
Published on
Updated on

LED Stumps Price: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने 13 धावांनी विजय मिळवला. या विजयात पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने महत्त्वाचा वाटा उचलला. पण त्याच्यामुळे आयपीएलचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.

या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबईसमोर विजयासाठी 215 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात मुंबईला 16 धावांची गरज होती. यावेळी पंजाबकडून अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्या चेंडूवर टिम डेव्हिडला केवळ एकच धाव दिली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही तिलक वर्मा धाव काढू शकला नाही.

Arshdeep Singh
IPL 2023: पंजाबने रोखला मुंबईचा विजय रथ! वानखेडेवर रोहितसेना पराभूत, सूर्या-ग्रीनची फिफ्टी व्यर्थ

मात्र, तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलक वर्माला, तर चौथ्या चेंडूवर नेहल वढेराला त्रिफळाचीत केले. विशेष म्हणजे या दोन्ही वेळेस मधले स्टंप तुटले. अखेर पहिल्या चार चेंडूत फक्त एक धाव आणि दोन विकेट्स गेल्याने मुंबई इंडियन्स संकटात सापडले अखेरच्या दोन चेंडूतही अर्शदीपने 1 धावच दिली. त्यामुळे पंजाबने हा सामना सहज जिंकला.

अर्शदीपने तोडलेले स्टंप लाखोंचे

आजकाल क्रिकेटमध्ये एलइडी स्टंप वापरले जातात, ज्यात कॅमेरा आणि बेल्सही असतात. या संपूर्ण स्टंपचा सेट वेगवेगळ्या कंपनीचा, ब्रँडचे आणि विविध सुविधा असलेले सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या किमतीतही फरक आहे.

Arshdeep Singh
IPL 2023:W, W, W, W...! चार चेंडूत चार विकेट्स अन् हार्दिकच्या गुजरातचा लखनऊवर रोमांचक विजय

झिंग सिस्टिम, ज्यात कॅमेरा असलेले स्टंप आणि झिंग बेल्स असतात त्याची किंमत साधारण भारतीय मुल्यानुसार 32 ते 41 लाखांच्या दरम्यान आहे. तसेच अन्य काही कंपन्याच्या अशाच स्टंप प्रणालीसाठी 4 ते 16 लाखांदरम्यान खर्च येतो.

दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार अर्शदीपने अखेरच्या षटकात तिलक आणि नेहाल यांनी त्रिफळाचीत करताना तोडलेल्या स्टंपची किंमत 8 ते 10 लाख रुपये इतकी आहे.

गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटमधील स्टंप अनेक सुविधांनी विकसीत झालेले दिसले आहेत. त्यामुळे ते आता महागडेही झाले असल्याने खेळाडूंना आता त्यांना घेऊन जाण्याची परवानगी नसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com