GT vs RR Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: चौथ्या विजयासाठी गुजरात-राजस्थान सज्ज! अशी आहे दोन्ही टीमची Playing XI

आयपीएल २०२३ स्पर्धेत आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होत आहे.

Pranali Kodre

Gujarat Titans vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी दोन सामने खेळले जात असून दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होत आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी गुजरातच्या संघात बदल झाला आहे. विजय शंकर या सामन्यात खेळणार नसल्याचे नाणेफेकीवेळी कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले आहे. त्याच्याऐवजी अभिनव मनोहरला संधी देण्यात आली आहे.

तसेच राजस्थान रॉयल्सच्या संघात ट्रेंट बोल्टचे पुनरागमन झाले आहे. त्याला जेसन होल्डरच्या जागेवर खेळवण्यात येणार आहे.

राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये जॉस बटलर, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर आणि ऍडम झम्पा या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच गुजरातने प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हिड मिलर, रशीद खान आणि अल्झारी जोसेफ या तीन परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

त्यामुळे राजस्थानला केवळ भारतीय खेळाडूलाच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरता येणार आहे. पण गुजरातला प्लेइंग इलेव्हनमध्ये तीनच परदेश खेळाडू खेळवल्याने परदेशी किंवा भारतीय खेळाडूची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड करण्याची संधी आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी गुजरातने जोशुआ लिटिल, जयंत यादव, नूर अहमद, श्रीकर भरत आणि दसून शनका यांची निवड केली आहे. तसेच राजस्थानने राखीव खेळाडूंमध्ये देवदत्त पडिक्कल, मुरुगन अश्विन, दोनावोन फेरेईरा, नवदीप सैनी आणि जो रुट यांची निवड केली आहे.

हा दोन्ही संघांचा या हंगामातील प्रत्येकी पाचवा सामना असून दोन्ही संघांनी 3 सामने जिंकले आहेत आणि 1 सामना पराभूत झाला आहे. त्यामुळे रविवारी दोन्ही संघ चौथ्या विजयासाठी एकमेकांना आव्हान देतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा

  • राजस्थान रॉयल्स - जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT