Player Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: SRH, CSK, PBKS, GT साठी आनंदाची बातमी, दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू...

IPL 2023: आयपीएल 2023 च्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात झाली आहे, पण या लीगची खरी मजा आजपासून म्हणजेच 3 एप्रिलपासून येणार आहे.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 च्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात झाली आहे, पण या लीगची खरी मजा आजपासून म्हणजेच 3 एप्रिलपासून येणार आहे, कारण आता 4 संघ अधिक मजबूत दिसणार आहेत. या संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत. आज हे सर्व खेळाडू भारतात पोहोचणार आहेत.

या संघांसाठी आनंदाची बातमी आहे

आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या सामन्याला मुकलेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आज आपापल्या फ्रँचायझींमध्ये सामील होणार आहेत.

या खेळाडूंच्या आगमनानंतर एसआरएच, सीएसके, पीबीकेएस, जीटी संघ अधिक मजबूत दिसतील. हैदराबाद संघात कर्णधार एडन मार्कराम, मार्को जॅन्सन आणि हेनरिक क्लासेन यांच्यासह दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) 3 खेळाडूंचा समावेश आहे.

हे खेळाडू आपापल्या संघात सामील होतील

एडन मार्कराम

डेव्हिड मिलर

कागिसो रबाडा

क्विंटन डी कॉक

एनरिक नॉर्टजे

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात का खेळू शकले नाहीत?

खरेतर, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील क्वालिफायर अंतर्गत, नुकत्याच खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2 सामने बाकी होते.

शेवटचा सामना 2 एप्रिल रोजी झाला. दक्षिण आफ्रिकेने ही मालिका जिंकली. या मालिकेमुळे दक्षिण आफ्रिकेचे बहुतांश खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकले नाहीत.

मात्र, आता सर्व खेळाडू आज आपापल्या संघात सामील होऊ शकतात आणि पुढील सामन्यात खेळताना दिसतील.

IPL 2023 मध्ये सहभागी होणारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू

फाफ डु प्लेसिस

क्विंटन डी कॉक

कगिसो रबाडा

एडेन मार्कराम

लुंगी एनगिडी

एनरिक नार्जे

डेविड मिलर

राइली रुसो

ट्रिस्टन स्टब्स

मार्को जॉन्सन

डुआन जॉन्सन

डोनोवन फेरेरा

डेवाल्ड ब्रेविस

सिसंडा मगाला

ड्वेन प्रिटोरियस

हे खेळाडू आयपीएलच्या पहिल्याच सामन्यापासून त्यांच्या संघांशी जोडले गेले आहेत

फॉफ डु प्लेसिस

डुआन जॉन्सन

ड्वेन प्रीटोरियस

डेवॉल्ड ब्रेविस

ट्रिस्टन स्टब्स

राइली रुसो

डोनोवन फेरेरा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT