IPL 2023: Jio Cinema ने केला मोठा रेकॉर्ड, पहिल्या वीकेंडमध्ये 147 कोटी व्ह्यूज...

IPL 2023: डिजिटल प्लॅटफॉर्मवर IPL (Indian Premier League 2023) प्रसारित करणार्‍या Jio Cinema (JioCinema) ने एक नवीन विक्रम केला आहे.
Jio Cinema
Jio CinemaDainik Gomantak

IPL 2023: डिजिटल प्लॅटफॉर्मवर IPL (Indian Premier League 2023) प्रसारित करणार्‍या Jio Cinema ने एक नवीन विक्रम केला आहे.

त्याचवेळी, जिओचा दावा आहे की, ते मागील संपूर्ण सीझनच्या म्हणजेच IPL 2022 च्या डिजिटल व्ह्यूअरशिपपेक्षा जास्त आहे, जे Disney+Hotstar वर स्ट्रीम करण्यात आले होते.

2 भाषांमध्ये 4K प्रसारणासह मैदानात उतरलेल्या Jio सिनेमाला IPL 2023 (IPL 2023 LIVE) च्या पहिल्या वीकेंडमध्ये 147 कोटी व्ह्यूज आणि 5 कोटी नवीन अॅप डाउनलोड यूजर्स (IPL 2023 LIVE Broadcast) मिळाले आहेत.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील सीझनचा पहिला सामना जिओ सिनेमावर 16 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला होता.

त्याचवेळी, एकाच दिवसात 2.5 कोटींहून अधिक अॅप डाउनलोड करण्यात आले. अशा प्रकारे, सुरुवातीच्या आठवड्यात नवीन दर्शकांची एकूण संख्या 100 दशलक्ष झाली, तर नवीन अॅप डाउनलोडची संख्या 50 दशलक्ष ओलांडली.

Jio Cinema
IPL 2023: धोनी आजचा सामना खेळणार नाही? सामन्याआधी आली मोठी अपडेट

दुसरीकडे, भारतात (India) क्रिकेटची डिजिटल बाजारपेठ किती मोठी झाली आहे, हे IPL 2023 च्या पहिल्या दिवशी दिसून आले.

Jio सिनेमाला पहिल्या दिवशी एकूण 500 दशलक्ष व्ह्यूज मिळाले, त्यापैकी 60 दशलक्ष युनिक व्ह्यूज होते. इंग्रजी, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलगू, भोजपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, बंगाली, गुजराती भाषांमध्ये IPL चे प्रसारण करण्यात आले.

भोजपुरी कॉमेंट्री सोशल मीडियावर व्हायरल झाली. प्रथमच आयपीएलची कॉमेंट्री भोजपुरीमध्ये होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com