Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, DC vs CSK: चेन्नईविरुद्ध दिल्ली 'या' गोष्टीत करणार मोठा बदल, अखेरच्या मॅचआधी घोषणा

दिल्ली कॅपिटल्स त्यांचा IPL 2023 मधील अखेरचा सामना शनिवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals will be wearing a special rainbow jersey: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (20 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ नेहमीपेक्षा वेगळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

घरच्या मैदानावर हंगामातील अखेरचा सामना खेळताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ रेनबो जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. म्हणजेच त्यांच्या जर्सीवर इंद्रधनुष्यातील सात रंगाच्या छटा असणार आहेत. अशी रेनबो जर्सी दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडू 2020 सालापासून दरवर्षी एका सामन्यात परिधान करतात. यामागे भारतातील विविधता साजरी करण्याचा हेतू असतो.

गेल्यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्लीने रेनबो जर्सी घातली होती. या जर्सीचा नंतर लिलाव झाला, त्यातून आलेले पैसे कर्नाटकातील विजयनगर येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टसाठी देण्यात आले.

दरम्यान, यावर्षी चेन्नईविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात दिल्ली रेनबो जर्सी घालणार असल्याचे फ्रँचायझीकडून घोषित करण्यात आले आहे.

रेनबो जर्सीमध्ये दिल्ली अपराजीत

दरम्यान, दिल्लीने रेनबो जर्सीमध्ये खेळताना पराभव स्विकारलेला नाही. साल 2020 मध्ये या जर्सीमध्ये खेळताना त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 59 धावांनी पराभूत केले होते.

त्यानंतर 2021 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्लीने रेनबो जर्सी घालून 4 विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच गेल्यावर्षी कोलकाताविरुद्ध दिल्लीने रेनबो जर्सीमध्ये खेळताना 4 विकेट्सने विजय मिळवला होता.

दिल्लीचा अखेरचा सामना

खरंतर हा दिल्लीचा आयपीएल 2023 हंगामातील अखेरचा सामना आहे. दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. दिल्लीने आत्तापर्यंत 13 सामने खेळताना 5 विजय मिळवले आहेत, तर 8 सामन्यात विजय मिळवले आहेत. त्यामुळे ते सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर आहेत.

चेन्नईला विजय गरजेचा

दरम्यान, चेन्नई सध्या गुणतालिकेत 15 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असले, तरी त्यांना प्लेऑफमधील थेट प्रवेशालाठी दिल्लीविरुद्ध विजय मिळवणे गरजेचा आहे. जर त्यांना या सामन्यात पराभूत व्हावे लागले, तर त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

'व्याघ्रप्रकल्प' केवळ वाघांसाठी नव्हे, तर गोव्याच्या अस्तित्वासाठी!

SCROLL FOR NEXT