दिल्ली ओपनर अन् सिराजचं आधी मोठ्ठ भांडण अन् मग गळाभेट! DC vs RCB मॅचमध्ये दिसलं अनोखं दृश्य

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्यात मोहम्मद सिराज आणि दिल्लीच्या ओपनर्समध्ये वाद पेटल्याचे दिसले होते.
DC vs RCB
DC vs RCBDainik Gomantak

Mohammed Siraj involved in heated exchange with DC Openers: शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 50 वा सामना पार पडला. अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने 7 विकेट्सने विजय मिळवला. पण याच सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

बेंगलोरने दिल्लीसमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फिलिप सॉल्ट सलामीला उतरले. हे दोघे चांगली फलंदाजी करत असताना त्यांची 5 व्या षटकात बेंगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबरोबर भांडण झाले.

DC vs RCB
Virat Kohli in IPL: किंग कोहलीने फिफ्टी ठोकत घातला विक्रमांचा रतीब! IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा पहिलाच

झाले असे की या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर सॉल्टने षटकार ठोकले, तसेच तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पण त्यानंतर सिराजने वाईड बॉल टाकला. त्यावेळी सॉल्ट सिराजला काहीतरी म्हणाला, ज्यामुळे सिराज चिडला आणि तोही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे आला.

त्या दोघांमध्ये वाद सुरू झालेला असतानाच वॉर्नरही पुढे आला. तो सिराजला काही सांगत असतानाही सिराज चिडलेला दिसला. तसेच सिराजने तोंडावर बोट ठेवत सॉल्टला शांतही राहायला सांगितले. यादरम्यान वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच पंच आणि बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सर्व शांत झाले आणि खेळाडू आपापल्या जागेवर परतले.

सामन्यानंतर मारली मिठी

दरम्यान, सामन्यात भांडण झालं असले तरी सामना संपल्यानंतर मात्र सिराज आणि सॉल्ट यांच्यातील वाद मिटल्याचे दिसले. सामन्यानंतर या दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली आणि त्यांचे भांडण मैदानातच सोडले. यामुळे देखील या दोघांचे कौतुक होत आहे.

DC vs RCB
IPL 2023: धोनीचा विनिंग शॉट अन् CSK विरुद्ध 13 वर्षांनी चेपॉकवर मुंबईचा दारुण पराभव

मागच्या सामन्यातही झालेले वाद

दरम्यान, बेंगलोरचा याआधीचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध झाला होता. त्यावेळी बेंगलोरने 18 धावांनी विजय मिळवलेला. पण त्या सामन्यात विराट कोहली आणि लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक तसेच मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसले होते.

दिल्लीने जिंकला सामना

या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दिल्ली कॅपिटल्सने 16.4 षटकातच 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. दिल्लीकडून फिलिप सॉल्टने शानदार खेळ करत ८७ धावांची खेळी केली. तसेच रिली रौसोनेही चांगला खेळ करताना 35 धावांची खेळी केली. बेंगलोरकडून जोश हेजलवूड, कर्ण शर्मा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 181 धावा केल्या होत्या. बेंगलोरकडून विराट कोहलीने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. तसेच महिपाल लोमरोरने नाबाद 54 धावांची खेळी केली. त्याचबरोबर कर्णधार फाफ डू प्लेसिसने 45 धावा केल्या. दिल्लीकडून मिचेल मार्शने दोन विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com