DC vs PBKS Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: दिल्लीचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, पंजाबसाठी 'करो वा मरो'; पाहा Playing XI

आयपीएलमध्ये शनिवारी दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दिल्लीने मोठा बदल केलेला नाही, पण पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सिकंदर रझाला भानुका राजपक्षेऐवजी संधी देण्यात आली आहे.

या सामन्यासाठी पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि सिकंदर रझा या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह फिलिप सॉल्ट, मिचेल मार्श आणि रिली रोसौ या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

त्यामुळे पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीनच परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी किंवा भारतीय खेळाडूला वापरता येणार आहे. तसेच दिल्लीला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय खेळाडूलाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये दिल्लीने मनिष पांडे, रिपल पटेल, ललित यादव, चेतन साकारिया आणि अभिषेक पोरेल यांना संधी दिली आहे. तसेच पंजाबने राखीव खेळाडूंमध्ये नॅथन एलिस, अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया आणि मोहित राठी यांना राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली आहे.

हा सामना पंजाबसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा सामना ते पराभूत झाल्यास त्यांच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो. तसेच त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल. दिल्लीचे आव्हान यापूर्वीच जवळपास संपुष्टात आले आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रिली रोसौ, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार

  • पंजाब किंग्स - प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करान, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

Mangal Aditya Rajyoga 2026: 2 एप्रिलला महाधमाका! 'मंगळ-आदित्य' राजयोगामुळे उजळणार 'या' 3 राशींचे भाग्य; धनवर्षावासह होणार प्रगतीचे नवे मार्ग खुले

Goa Cabinet 2026: 'म्हजे घर' योजनेसाठी जमीन महसूल कायद्यात बदल, फोंडा पोटनिवडणुकीनंतर रिक्त मंत्रिपद भरणार; मुख्यमंत्री सावंतांनी स्पष्टच सांगितलं

फर्स्ट क्लासमध्ये ठोकलं ताबडतोब शतक, RR कडून खेळला, आता विकत घेतली अख्खी टीम! कोण आहे RCB चा नवा चेअरमन?

SCROLL FOR NEXT