Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Mahabharat Actor Saurav Gurjar Arrested: 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेतील 'भीम' आणि 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'जोर' या पात्राने घराघरांत पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता आणि माजी डब्ल्युडब्ल्युई रेसलर सौरव गुर्जरला लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली.
Mahabharat Actor Saurav Gurjar Arrested
Mahabharat Actor Saurav Gurjar ArrestedDainiK Gomantak
Published on
Updated on

Mahabharat Actor Saurav Gurjar Arrested: 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेतील 'भीम' आणि 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'जोर' या पात्राने घराघरांत पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता आणि माजी डब्ल्युडब्ल्युई रेसलर सौरव गुर्जरला लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली. एका 29 वर्षीय महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबई विमानतळावरुन लुकआऊट सर्क्युलरच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सौरव गुर्जरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

हैदराबाद येथील गच्चीबोवली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने 15 ऑगस्ट रोजी तक्रार नोंदवली होती. पीडितेच्या माहितीनुसार, 2021 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. सौरव गुर्जर हा आधीच विवाहित असल्याचे नंतर उघड झाले, तरीही त्याने महिलेला पत्नीचा दर्जा देण्याचे आणि नवीन आयुष्य सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने अमेरिकेतील आपली नोकरी सोडून भारतात येऊन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जेव्हा जेव्हा महिला लग्नाचा विषय काढायची, तेव्हा सौरव ब्लॉक करुन संपर्क तोडत असत.

Mahabharat Actor Saurav Gurjar Arrested
Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यान दोघे एकत्र राहिले, परंतु त्यानंतर सौरवने पुन्हा एकदा सर्व संबंध तोडून टाकले. वारंवार होणाऱ्या मानसिक प्रताडना, भावनिक तणाव आणि आर्थिक नुकसानीला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सौरव गुर्जर याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. 17 सप्टेंबरच्या रात्री ते मध्य पूर्वेकडून मुंबई विमानतळावर उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. गच्चीबोवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. साईडुलु यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Mahabharat Actor Saurav Gurjar Arrested
Salman Khan: "सलमान आणि मी एकत्र नग्न होऊन आंघोळ केलीय पण...", भाईजानच्या खास फ्रेंडने केला धक्कादायक खुलासा

सौरव गुर्जरला 2013 मध्ये स्टार प्लसवरील 'महाभारत' मालिकेत भीमची भूमिका साकारुन प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर त्याने 'संकट मोचन महाबली हनुमान' मध्येही काम केले. 2018 मध्ये त्याने WWE मध्ये एन्ट्री केली, जिथे तो 'सांगा' नावाने प्रसिद्ध झाला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com