IPL 2023: आयपीएल 2023 च्या 57 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. त्याने डावाच्या सुरुवातीला दोन षटकार मारुन मोठा टप्पा गाठला. जिथे त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे सोडले.
त्याचवेळी मुंबई इंडियन्ससाठीही एक विशेष कामगिरी केली. गेल्या पाच सामन्यांपासून रोहित शर्माची बॅट थोडी शांत होती आणि त्याला केवळ 12 धावा करता आल्या.
पण या सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली. तो 18 चेंडूत 29 धावा करुन बाद झाला. राशिद खानने त्याची विकेट घेतली. रोहितने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
दरम्यान, रोहित शर्माने दोन षटकार मारताच आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत मिस्टर 360 डिग्री एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले.
तसेच, तो आता या यादीत ख्रिस गेलनंतर सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू बनला आहे. त्याने डिव्हिलियर्सचा 251 षटकारांचा आकडा पार केला.
यासोबतच, त्याने मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) 200 षटकारही पूर्ण केले. म्हणजेच, हिटमॅनने आपल्या फ्रँचायझीसाठी षटकारांचे विशेष द्विशतक पूर्ण करुन पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.
ख्रिस गेल - 357 षटकार (142 सामने)
रोहित शर्मा - 252 षटकार (239 सामने)
एबी डिव्हिलियर्स - 251 षटकार (184 सामने)
एमएस धोनी - 239 षटकार (245 सामने)
विराट कोहली - 229 षटकार (234 सामने)
तसेच, या मोसमात अद्याप रोहित म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. 12 सामन्यांत त्याच्या बॅटमधून केवळ 220 धावा झाल्या आहेत.
गेल्या पाच सामन्यांपैकी त्याला दोनदा खातेही उघडता आले नाही आणि त्याच्या बॅटमधून केवळ 12 धावा आल्या. या सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली, पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला.
आयपीएलच्या (IPL) इतिहासात 250 षटकार मारणारा ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सनंतर रोहित हा तिसरा खेळाडू आहे. त्याचबरोबर मुंबईसाठी 200 षटकार पूर्ण करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.