US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

US Bank Layoffs India 80 Customer Service Employees: कॉर्पोरेट जगतातून एक धक्कादायक घटना समोर आली. रेडिटवर एका कर्मचाऱ्याने शेअर केलेल्या पोस्टने खळबळ उडवून दिली.
US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
US Bank LayoffsDainik Gomantak
Published on
Updated on

US Bank Layoffs India 80 Customer Service Employees: कॉर्पोरेट जगतातून एक धक्कादायक घटना समोर आली. रेडिटवर एका कर्मचाऱ्याने शेअर केलेल्या पोस्टने खळबळ उडवून दिली असून भारतातील वर्कप्लेस कल्चर आणि आयटी तसेच कस्टमर सर्व्हिस क्षेत्रातील नोकरीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका नामांकित अमेरिकन बँकेने भारतात कार्यरत असलेल्या आपल्या संपूर्ण कस्टमर सर्व्हिस टीमला अवघ्या 5 मिनिटांच्या एका गुगल मीट कॉलवर कामावरुन काढून टाकल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या एकाच निर्णयामुळे जवळपास 80 भारतीय कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची (Employees) नाईट शिफ्ट संध्याकाळी 6:30 वाजता सुरु होणार होती. मात्र, तांत्रिक कारणाचे नाव सांगून कर्मचाऱ्यांना त्यादिवशी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर रात्री 9:30 वाजता वरिष्ठ व्यवस्थापनासोबत एका तातडीच्या मीटिंगचे आयोजन करण्यात आले. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टबाबत चर्चा असेल असा विचार करुन कर्मचारी कॉलवर जॉईन झाले. परंतु, मीटिंग सुरु होताच व्यवस्थापनाने सर्वांची सेवा तातडीने समाप्त केली जात असल्याचे घोषित केले. अवघ्या 5 मिनिटांत हा कॉल संपला आणि 80 कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले.

US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

बँक व्यवस्थापनाने या सामूहिक नोकर कपातीचे कारण खराब कामगिरी आणि आउटपुट कमी असल्याचे सांगितले. मात्र, कर्मचाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. जर प्रकरण कामगिरीशी संबंधित असते तर काही ठराविक कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असती, पूर्णच्या पूर्ण 80 जणांच्या टीमला एकाच वेळी कसे काढले जाऊ शकते, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. संबंधित रेडिट पोस्टमध्ये बँकेच्या नावाचा थेट उल्लेख नसला तरी, या घटनेमुळे बीपीओ आणि कस्टमर सर्व्हिस क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे.

US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

आजकालच्या डिजिटल युगात वन-ऑन-वन संवाद साधण्याऐवजी सामूहिक व्हिडिओ कॉलवर कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याच्या वाढत्या पद्धतीवर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांवर ईएमआय, घराचा खर्च आणि कुटुंबाची जबाबदारी पेलण्याचे मोठे संकट ओढवले. परदेशी कंपन्यांसाठी भारतात काम आउटसोर्स करणे जितके सोपे आहे, तितकेच भारतीय कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता काढून टाकणेही सोपे झाले आहे का, असा गंभीर प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com