DC vs MI Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: भोपळा फोडणार कोण? पहिल्या विजयासाठी मुंबई-दिल्ली येणार आमने-सामने

आयपीएल 2023 मधील 16 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Delhi Capitals vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत 15 सामने खेळवण्यात आले आहेत. या 15 सामन्यांनंतर 10 संघांपैकी 8 संघांनी किमान एकतरी विजय मिळवला आहे. पण मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन असे संघ आहेत, ज्यांना अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेत अद्यापही त्यांच्या गुणांचे खाते उघडलेले नाही.

आता याच दोन संघात आज सामना रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांपैकी गुणांचा भोपळा कोण फोडणार, याची उत्सुकता असणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

मुंबई इंडियन्सला आत्तापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांकडून पराभव पत्करावा लागला आहे. या दोन्ही लढतीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत मुंबईच्या खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी झाली आहे.

कर्णधार रोहित शर्मा (22 धावा), इशान किशन (42 धावा), टीम डेव्हिड (35 धावा) या फलंदाजांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. तसेच कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात मुंबईच्या संघात समावेश करण्यात आलेल्या कॅमेरून ग्रीनलाही अद्याप सूर गवसला नाही. त्याला दोन लढतीमध्ये 17 धावाच करता आल्या आहेत.

मुंबईचे सर्वात मोठे अपयश हे सूर्यकुमार यादवच्या रूपात समोर आले. त्याला दोन लढतीत 16 धावाच करता आल्या आहेत. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजांचा प्रवासही अडथळ्याचा ठरत आहे. जोफ्रा आर्चर पहिल्या लढतीत खेळला, पण त्यानंतर चेन्नईविरुद्धच्या लढतीत त्याला बसवण्यात आले. लढतीनंतर सांगण्यात आले, की त्याला दुखापत झाली आहे.

दिल्लीच्या संघाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांना आत्तापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांकडून पराभव पत्करावा लागला आहे.

दिल्लीच्या फलंदाजांकडून अद्याप मोठी खेळी झालेली नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने दोन अर्धशतकांसह 158 धावा फटकावल्या आहेत, पण त्याने फक्त 117.03 च्या सरासरीने धावा काढलेल्या आहेत. त्याला सरासरी सुधारण्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. पृथ्वी शॉ, सर्फराझ खान, रायली रॉसो यांच्याकडून सपशेल निराशा झाली आहे.

दिल्लीच्या संघाला गोलंदाजी विभागात एन्रिच नॉर्किया आणि कुलदीप यादव या दोघांकडून मोठ्या आशा आहेत; मात्र अद्याप दोघांनी अप्रतिम अशी कामगिरी केलेली नाही. खलील अहमद, मुकेश कुमार, चेतन, सकारिया, अक्षर पटेल यांना प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवता आलेले नाही. अक्षर पटेलकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. एकूणच काय, तर दोन्ही संघांतील स्थानिक खेळाडूंवरच लढतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT